“सुज्ञ होणे”

"सुज्ञ होणे"

“सुज्ञ होणे”

वचन:

नीतिसुत्रे 11:30
नीतिमानाचे फळ जीवनाचा वृक्ष होय, आणि जो ज्ञानी असतो तो जिवास वश करतो.

निरीक्षण:

ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून आपण जे निर्माण करतो ते जीवनाचे झाड आहे असे सांगून शलमोन सुरुवात करतो. हे एक रूपक आहे जे आपण प्रथम “जीवनदाता” आहोत या कल्पनेला प्रोत्साहन देते. मग तो आपल्याला सांगतो की जी व्यक्ती जीव वाचवण्याचा प्रयत्न करते त्याला आपल्या स्वर्गीय पित्याकडून बुद्धी प्राप्त होते! खरी बुद्धी असलेला पुरुष किंवा स्त्री समंजसपणाने परिपूर्ण आहे आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत काय करावे हे माहित असते. ही “सुज्ञ होणे” याची गुरुकिल्ली आहे.

लागूकरण:

एक तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून, माझ्या आयुष्याविषयी देवाचे वचन म्हणून, मी हे वचन कधीही विसरु शकत नाही. मी असे मित्र पाहिले जे त्या वेळी हुशार वाटले पण लोक त्यांच्यापासून दूर जातील अशा पद्धतीने ते जगत होते. मला माझ्या आयुष्यात माणसं हवी होती. आणि म्हणून, मी जिथे गेलो तिथे, मी “सुवार्तेचा” प्रचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. कालांतराने मी पाहिले की त्यांच्यापैकी बरेच जण ख्रिस्ताचे अनुयायी बनले आहेत. जितके जास्त मी लोकांना ख्रिस्ताकडे येताना पाहिले, तितकी संधीची दारे माझ्यासाठी उघडली गेली. एक वेळ अशी आली की मला कोणते दार निवडायचे हे ठरवायचे होते. तेव्हा मला बुद्धीची गरज होती. मी निवडलेल्या प्रत्येक दाराने पुढे जाण्याचा आणखी चांगला मार्ग मला सापडला. जितके जास्त लोक येशूचे अनुसरण करत होते, तितकेच मला अधिक शहाणपण येत होते. “सुज्ञ होणे” यावरील ही माझी स्वतःची साक्ष आहे.

प्रार्थना:

प्रिय येशू,

माझ्या तारुण्यात हे वचन मला अधोरेखित केल्याबद्दल मी आज तुझा आभारी आहे. हा उतारा मी माझ्या जीवनात आणि कार्याच्या अग्रभागी ठेवला आहे, तू मला अधिक स्पष्ट दिशा दिली आहे. मी तुझे कितीही आभार मानले ते कमीच आहेत! प्रभू मला अनेक लोकांपर्यंत जाण्यास मदत करत तुझ्या ज्ञानात वाढण्यास मदत कर कारण ज्ञान तू देतोस आणि चांगल्या देणग्या तुझ्यापासून आहेत, म्हणून तुझ्यावर अवलंबून राहण्यास मला मदत कर. येशुच्या नावात आमेन.