“आपली मनोवृत्ती”

“आपली मनोवृत्ती”

“आपली मनोवृत्ती”

वचन:

इफिस 4:23

आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हा.

निरीक्षण:

प्रेषित पौल या ठिकाणी थेट इफिस येथील तरुण मंडळीशी बोलत आहे. त्याने त्यांना सांगितले की तुम्ही परराष्ट्रीय वागतात तसे त्यांच्या जुन्या पध्दतीने वागत आहात. तो म्हणाला की आम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने सुरुवात करायला शिकवले ती ही शिकवण नाही. कामुकता आणि सर्व प्रकारची अशुद्धता यांचा समावेश असलेल्या जुन्या परराष्ट्रीय विचारसरणीचा विचार करू नका, असे आम्ही तुम्हाला शिकविले होते. म्हणून, पौलाने त्यांना सांगतो की  “तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हा”.

लागूकरण:

माझा नेहमीच असा विश्वास आहे की शब्द आणि कृती बदलण्याआधी मन बदलले पाहिजे. विचार करण्याची पद्धत बदलली पाहिजे. नवीन माहितीवर प्रक्रिया करण्याची पद्धत बदलली पाहिजे. एकदा का एखादी व्यक्ती येशूचा अनुयायी बनली की, त्यांनी त्यांच्या मनात युध्दाची तयारी केली पाहिजे कारण आपण जे काही बोलतो किंवा करतो ते मनातूनच सुरू होते. येशूला जाणून घेण्याआधी आपण सर्वजण चुकीच्या विचारसरणीमुळे त्रासलेले होतो, जे  “दुगंधीयुक्त विचार होते!” जेव्हा प्रेषित पौल फिलिप्पै 2:5 मध्ये म्हणतो, “अशी जी चित्तवृत्ती येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो; तो प्रत्यक्षात म्हणत होता की, “तुम्ही तुमची विचारसरणी बदलू शकता!” तुम्हाला नेहमीच चुकीचे विचार करण्याची गरज नाही. कारण जर तुमची विचार प्रक्रिया बदलत नसेल, तर तुम्ही वेदीवर येशूला काय अभिवचन देता त्याला काही अर्थ राहत नाही. “दुर्गंधीयुक्त विचारसरणी” आपण सोडून द्यावी जेणेकरून तुम्ही तुमच्या घरात शांतता प्रस्थापित करू शकता.  ह्या सर्व गोष्टींची सुरुवात “तुमच्या मनोवृत्तीने” होते. जर तुम्ही विचार करत असाल की “तुमच्या मनाच्या वृत्तीने” येशूने केले तसे कार्य कसे करावे, म्हणून मत्तय 5, 6 हे अध्याय वाचा. एकदा तुम्ही असे केल्यावर तुम्ही “तुमची मनोवृत्ती” बदलण्यास सुरुवात कराल.

प्रार्थना:

प्रिय येशू

माझ्या मनोवृत्तीत नेहमी चांगले विचार ठेवण्यास मदत केल्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. तुझे वचन सांगते, “मनुष्य जसा आपल्या अंत:करणात विचार करतो तसाच तो असतो. नकारात्मकता आणि संशयवृती या गोष्टी माझ्यापासून दूर कर. खरा विश्वास, आशा आणि प्रेम या गोष्टींकडे जावे व आत्म्याचे फळ माझ्यात दिसून यावे म्हणून मला सहाय्य कर. येशुच्या नावात आमेन.