आपले तारण कसे साधून घ्यावे?

आपले तारण कसे साधून घ्यावे?

आपले तारण कसे साधून घ्यावे?

वचन:

फिलिप्पै 2:12
म्हणून माझ्या प्रिय जनहो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करत आला आहात, ते तुम्ही, मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेषेकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही, भीत व कापत आपले तारण साधून घ्या;

निरीक्षण:

प्रेषित पौलाने लिहिलेल्या या वचनावर आज क्वचितच चर्चा केली जाते. तथापि, मी लहान असताना, मी अनेकदा यावर प्रचार करताना ऐकले आहे. येशूने आपल्याला पूर्ण तारण प्राप्त व्हावे म्हणून केलेल्या बलिदानाबद्दल प्रेषिताला वाटले तसे आपल्यालाही वाटते. वधस्तंभावरील त्याच्या मृत्यूमुळे आणि मरणातून पुनरुत्थान झाल्यामुळे, पौल म्हणतो की त्याला पित्याने स्वर्गातील सर्वोच्च स्थानावर विराजमान केले आहे आणि प्रत्येक नावापेक्षा सर्वात उंच नाव त्याला दिले आहे. प्रत्येक गुडघा त्याच्यापुढे टेकला जाईल आणि प्रत्येक जीभ कबूल करेल की येशू प्रभु आहे. असे म्हटले जात असताना, पौल नंतर सर्व विश्वासणाऱ्यांना आपले स्वत: चे तारण भीत व कापत साधून घेण्याचा सल्ला देतो.

लागूकरण:

जर तुम्ही कधी विचार केला असेल की “आपले तारण कसे साधून घ्यावे”?  याबद्दल प्रेषित पौल म्हणतो की ते भीत आणि कापत साधून घ्यावे. दुसऱ्या शब्दांत, ख्रिस्तामध्ये आपले जीवन एक आनंददायक अनुभव असले पाहिजे परंतु निश्चितपणे त्यास गृहीत धरले जाऊ नये. प्रत्येक वेळी, आपण, प्रभूवरील आपल्या प्रचंड प्रेमामुळे, त्याने आपणास तारण प्राप्त व्हावे म्हणून केलेले बलिदान लक्षात ठेवले पाहिजे. काही जण निरर्थक मार्गाने तारणाकडे वळतात, आपल्याला अनंतकाळचे जीवन मिळावे यासाठी येशूने मोजलेली किंमत ते समजून घेत नाही. इतर लोक ख्रिस्तामध्ये त्यांच्या जीवनाला पाहून असे म्हणतात की ते जन्मत: तारण पावले आहेत. परंतु जेव्हा देवाचा खरा पुरुष किंवा स्त्री प्रामाणिकपणे विचारतो की, “आपले तारण कसे साधून घ्यावे” तर बायबल त्यास उत्तर देते, भीती आणि कापत.

प्रार्थना:

प्रिय येशू,

मी पापी असता माझ्यासाठी तू केलेल्या तुझ्या बलिदानाबद्दल तुझे आभार, त्या बलिदानाद्वारे तू मला हर्षित केले आहेस. परंतू प्रभू मी हे समजून घ्यावे की हे बलिदान साधे नव्हते त्यासाठी तुला मोठी किंमत मोजावी लागली. हे तारण आम्हाला सहज नाही मिळाले त्यासाठी तुला आपला प्राण द्यावा लागला. म्हणून प्रभू त्या तारणाकडे पाहत असता व त्यास साधून घेत असता मला भीतीने व कापत त्याकडे जाण्यास मदत कर. माझे ह्रदय व चित्त नम्र कर. येशूच्या नावात आमेन.