व-चन:
1 करिंथ 9:27
तर, मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो; असे न केल्यास मी दुसऱ्यांस घोषणा केल्यावर कदाचित् मी स्वत: पसंतीस न उतरलेला असा ठरेन.
नि-रीक्षण:
संत पौल एखादा खेळाडू जसा आपले बक्षीस जिंकण्याचे ध्येय ठेवतो तसे बक्षीस जिंकण्यासाठी ध्येय ठेवणे याबद्दल बोलत आहे. तो म्हणतो की देहावर नियंत्रण मिळवणे आणि देहाच्या इच्छेनुसार नव्हे तर त्यास देवाच्या इच्छेच्या नियंत्रणाखाली आणणे हाच एकमेव मार्ग आहे. अशा प्रकारे, पौल म्हणाला, जर मी सुवार्ता सांगत आहे आणि धावेवर बक्षीस मिळविण्यास धावत आहे तर “मी इतरांना सुवार्ता सांगितल्यानंतर, मी धाव सोडणार नाही आणि त्यामुळे खोटा ठरणार नाही. “तो म्हणतो, “काहीही होवो, योग्यतेने जीवन जगा!”
ला-गूकरण:
गेल्या दोन वर्षातील महामारीचा रोग हा आपल्या प्रिय असलेल्या अनेकांचा गुप्त खुलासा करणारा ठरणार आहे. नैतिक अपयश आणि आर्थिक गोष्टींबद्दल असलेले अज्ञान आणि लपविलेल्या गोष्टी लोकांसमोर अशा प्रकारे उघड होतात ज्यामुळे लोकांचे करिअर, कुटुंब आणि जीवन यांचा नाश होतो. काय झाले आहे? घडलेली मुख्य गोष्ट म्हणजे ढोंगीपणा हा उघड होत आहे. अशा गोष्टींमध्ये अडकलेल्या ख्रिस्ती लोकांसाठी, हे परुशी लोकांच्या मार्गासारखे आहे, जेव्हा ते लोकांवर भारी भार टाकतात. असे भार जे ते स्वत: वाहू शकले नाहीत. पौलाने याच उताऱ्यात हे सांगितले. स्वत:च्या देहावर मात करण्यासाठी तो शारीरिकदृष्ट्या स्वत:च्या शरीराचा ताबा घेण्याबद्दल बोलत आहे! हे एक सदैव स्मरणपत्र आहे की आपण, “येशूचे अनुयायी” या नात्याने, “काहीही होवो, योग्यतेने जगले पाहिजे आणि आपली धाव पुर्ण केली पाहीजे!”
प्रा-र्थना:
प्रिय येशू,
मला तुझ्या इच्छेप्रमाणे जगण्यास मदत कर! मला आता, उद्या आणि येणाऱ्या प्रत्येक दिवसात तुझ्या सहाय्याची आवश्यकता आहे. माझ्या देहावर नियंत्रण ठेवण्यास व तू दिलेली कामगीरी पार पाडण्यास व धाव संपविण्यास मला मदत कर! आतापर्यंत माझा सहाय्यक झाला आहेस म्हणून तुला धन्यवाद, येशूच्या नावात आमेन.