“मोशे”

"मोशे"

“मोशे”

वचन:

होशेय 12:13
एका संदेष्ट्याच्या हस्ते परमेश्वराने इस्राएलास मिसर देशातून बाहेर आणले, दुसर्‍या संदेष्ट्याच्या हस्ते त्याचे रक्षण करवले.

निरीक्षण:

येथे होशेय संदेष्टा इस्राएलाच्या लोकांना आठवण करून देतो की परमेश्वराने त्यांना “मोशे” हा संदेष्टा कसा दिला, ज्याने आपले लोक इस्राएल यांचे रक्षण केले आणि मेंढपाळ आपल्या मेंढरांचे नेतृत्त्व करतो तसे त्यांचे नेतृत्व केले.  त्याने त्यांना केवळ मिसरच्या गुलामगिरीतून बाहेर काढले नाही तर तांबडा समुद्र पार करून पलीकडे नेले आणि चाळीस वर्षे भटकत असताना त्यांना रानात ठेवले. त्याने त्यांचे नेतृत्व केले आणि आजारपण, पीडा, युद्ध, दुष्काळ, रोगराई यातून त्या वर्षांमध्ये त्यांचे रक्षण केले. म्हणून जेव्हा इस्राएलाच्या लोकांनी होशेयाच्या काळात परमेश्वराच्या संदेष्ट्यांना मूर्ख म्हटले होते, तेव्हा देवाने असा युक्तिवाद केला की इस्राएलाच्या इतिहासातील सर्वात महान पुढारी संदेष्टा “मोशे!” होता

लागूकरण:

काहीवेळा आपण आपल्या सोयीच्या बिंदूतून जे पाहतो तेच आपल्याला मूर्ख असल्याचे वाटते. पण आपल्या तथाकथित मुर्खामध्ये देव काय पाहतो, तो मोठा पुढारी आहे असे पाहतो. असे असू शकते की आपण जे पाहत आहोत ते आपल्या स्वतःच्या पापामुळे देव जे पाहत आहे त्याच्या अगदी विरुद्ध असते? आपण एक मूर्ख पाहतो, देव “मोशे” पाहतो. इथे एक वृध्द होता ज्याने देवाला वाईट रीतीने नापास केले होते आणि आता तो चाळीस वर्षांपासून आपल्या सासऱ्याच्या मेंढ्या पाळत होता! ऐंशी वर्षांच्या वृद्धापकाळात देवाने त्याचे लोक इस्राएल यांना गुलामगिरीतून बाहेर नेण्यासाठी “मोशेला” पाचारण केले आणि त्याने तसे केले.  पण आता, महान देवाचा महान पुढारी, “मोशे” स्वर्गात जाऊन अनेक वर्षे उलटली होती आणि इस्राएल लोक पुन्हा संकटात सापडले होते. त्यांना त्यांच्यातील खरा संदेष्टा ओळखता आला नाही. आज आपण अशा गडबडीत आहोत की आपल्यावर असलेल्या  मनुष्यांच्या पुढाऱ्यावरून आपली दृष्टी काढून आपल्यामध्ये असलेल्या “मोशे” कडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. माझा असा विश्वास आहे, देवाचा एक संदेष्टा आहे, ख्रिस्तविरोधी नाही, जो आपल्याला त्याच्या येण्याआधी आणखी एका संजीवनात जाण्यास मदत करेल.

प्रार्थना:

प्रिय येशू,

आज मी हा उतारा वाचला आहे म्हणून मला विश्वास आहे की आपल्यापैकी एक “मोशे” असेल जो उभा राहील आणि म्हणेल, “चालण्याचा हा मार्ग आहे त्यावर चाला!” प्रभु, जगभरात तुझ्या लोकांना राखण्यासाठी आम्हाला पूर्वी कधीही नव्हते अशा नवीन संदेष्ट्यांची गरज आहे. आम्हाला मदत कर, मी प्रार्थना करतो. येशुच्या नावात आमेन.