वचन:
यशया 9:2
अंधकारात चालणार्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे; मृत्युच्छायेच्या प्रदेशात बसणार्यांवर प्रकाश पडला आहे.
निरीक्षण:
यशयाने हा संदेश दिला तेव्हा तो स्वतः आहाज राजाच्या भयंकर आणि अंधकारमय शासनात जगत होता. तरीही ही भविष्यवाणी, जी तुम्ही वाचत आहात, ती येणारा मशीहा, येशू याच्याबद्दलची भविष्यवाणी आहे. बेथलेहेममध्ये जन्मलेल्या आणि गालीलमध्ये वाढलेल्या येशूपासून ते अद्याप शेकडो वर्षे दूर होते, परंतु यशयाच्या या भविष्यसूचक संदेशाने देवाच्या लोकांसाठी नवीन आशा निर्माण केली असावी. का? कारण ते त्या वेळी अंधारात जगत होते आणि त्यांच्या अंधाऱ्या जगात प्रकाश येण्याचा विचारच त्यांच्यासाठी पुरेशी आशा होती. येशू, “तो प्रकाश आहे.”
लागूकरण:
या समयी तुम्ही कोणत्या अंधाऱ्या गोष्टींशी झगडत आहात? कदाचित आज तुम्हाला जीवनात काहीच चांगले नसेल दिसत. सर्वत्र निराशा व अंधकार वाटत असेल. आजार, अपयश, तणाव, गरीबी, भांडणे व इतर अशा गोष्टींमुळे तुम्हाला त्या अंधकाराचा अनुभव येत असेल. कदाचित तुमचा अंधार तुमच्यासाठी खूप मोठे ओझे झाले आहे. तुम्हाला हे सांगण्यास मला आनंद होत आहे की तुम्हाला आणखी एकट्याने हा भार सहन करावा लागणार नाही कारण येशू, “तो प्रकाश आहे.” मला खात्री आहे की तुम्ही किडे किंवा उंदिर पाहीले असतील लाईट लावल्यावर लगेच ते पसार होतात. माझ्यावर विश्वास ठेवा, जेव्हा येशू जो प्रकाश आहे, तो तुमच्या अंधारातील जीवनात येईल, तेव्हा प्रत्येक दुष्ट गोष्टींना पळून जावे लागेल कारण “तो प्रकाश आहे!”
प्रार्थना:
प्रिय येशू,
तू माझा प्रकाश आणि माझे तारण आहेस. तू नेहमी माझ्यासोबत आहेस हे मला माहीत असल्याने, मी जगाच्या इतर भागावर एक प्रचंड उडी मारण्यास उठलो आहे!! प्रत्येक दिवस तुझ्यासोबत एक नवीन दिवस आहे. प्रभु, माझ्या आयुष्यातील रात्र कायमची निघून गेली आहे याबद्दल तुझे आभार कारण तुच खरा प्रकाश आहे. येशुच्या नावात आमेन.