“मी पुन्हा उठेन!”

“मी पुन्हा उठेन!”

वचन:

मीखा 7:8

अगे माझ्या वैरिणी, माझ्यामुळे आनंद करू नकोस; मी पडले, तरी पुन्हा उठेन; मी अंधारत बसले, तरी परमेश्वर मला प्रकाश असा होईल.

निरीक्षण:

हा शास्त्राचा एक अतिशय अनोखा उतारा आहे. मी असे म्हणण्याचे कारण म्हणजे मागील अध्यायात, मीखा संदेष्टा देवासाठी बोलला आणि देव इस्राएलाच्या पापांवर आरोप ठेवत आहे अशी भविष्यवाणी त्याने केली. पण आता, या अध्यायात, मीखा संदेष्टा देवाच्या आरोपांना आणि त्यांच्या शत्रूंना, दिलेल्या इस्राएलाच्या प्रतिसादाबद्दल बहुधा बाबेल आणि अदोम यांना देखील बोलतो.  “माझ्यामुळे आनंद करण्याचा विचारही करू नकोस. होय, मी पतन झाले आणि मी पडले पण लवकरच, “मी पुन्हा उठेन!” इस्राएलाने पुढे असे म्हटले की, “मी अंधारात बसले, तरी परमेश्वर मला प्रकाश असा होईल.”

लागूकरण:

मीखा इस्राएलासाठी बोलत राहिला आणि परमेश्वराची स्तुती करत राहिला आणि देवाची प्रार्थनाही करत राहिला. मला असे वाटते की येथे असे म्हणणे अगदी योग्य आहे की असे काही वेळा घडते जेव्हा तुम्ही आणि मी रुळांवरून घसरतो, किंवा निश्चितपणे प्रभुला निराश करतो. त्या काळात अगदी जवळच्या माणसाजवळ धावून जाण्याऐवजी आणि लहान मुलासारखे शोक करण्याऐवजी, आपण आपली हनुवटी उचलून आपले खांदे मागे टाकण्याचे धैर्य शोधा आणि विश्वासाने म्हणा, “मी पुन्हा उठेन!  गर्विष्ठ मार्गाने नव्हे, तर विश्वासाने भरून. आपला देव प्रेमळ व क्षमाशील प्रभू आहे हे जाणून पन्हा उठून उभा राहण्यास तयार असा. मोह नेहमी सोडायचा आणि म्हणायचे, “बस! मला खात्री आहे की ते संपले आहे. अशा प्रकारच्या पतनासाठी देव मला या जगात कशी क्षमा करू शकेल काय?” पण यिर्मयाच म्हणतो, “त्याची दया रोज सकाळी नवीन होते.” तो तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम करणे कधीही थांबवणार नाही! त्याला क्षमा करणे आवडते कारण तुम्ही आणि मी देखील क्षमा करावी अशी त्याची इच्छा आहे. तर या समयी, उठा आणि या सर्व गोष्टींतून बाहेर पडा, “मी पुन्हा चुका केल्या आहेत” असे म्हणत राहू नका तर माझ्याबरोबर म्हणा. “मी पुन्हा उठेन!”

प्रार्थना:

प्रिय येशू,

या समयी, मला खूप आनंद आहे की तू माझ्या आत्म्याचा प्रियकर आहेस. तुझ्या ह्रदयात माझ्यासाठी खोलवर प्रेम आहे आणि त्यामुळेच तू मला क्षमा करतो याबद्दल मी तुझा आभारी आहे. मला माहित आहे की मी तुला लाखो वेळा मला क्षमा करण्यासाठी विनंती केली आहे. मी खुप वेळा तुझ्या विरुध्द वागलो आहे व स्वत:ला त्रासात पाडून घेतले आहे. पण आज मी हे वाचत असता इथे आणि आत्ताही सांगायला तयार आहे, तुझ्या मदतीने….” मी पुन्हा उठेन!” येशुच्या नावात आमेन.