“दृष्टान्ताचे खोरे”

"दृष्टान्ताचे खोरे"

“दृष्टान्ताचे खोरे”

वचन:

यशया 22:1
दृष्टान्ताचे खोरे ह्याविषयीची देववाणी : तुम्ही सर्व धाब्यावर चढला त्या तुम्हांला काय झाले?

निरीक्षण:

यरुशलेमच्या टेकडीवर बांधलेली असल्याने हा एक असामान्य रस्ता होता. यरुशलेमच्या भिंतीबाहेरील प्रत्येकाला यरुशलेमला “वर जावे” लागत असे. पण यरुशलेम शहरात एक सखल जागा होती जी इतिहासकार आम्हाला सांगतात की “द ट्रोल्स” नावाच्या जवळ होती. त्यात खोरे असल्यासारखे होते. तेथेच अनेक संदेष्टे राहीले.  कारण ते एक खोरे होते म्हणून त्यास “दृष्टान्ताचे खोरे” असे म्हणतात, कारण तुम्ही या सखल जागेवरून वर नजर मारू शकता आणि पाहू शकता जे इतर पाहू शकत नाही. पण या प्रकरणात, होशेला माहित होते की एक परदेशी (बहुधा अश्शूरचे) सैन्य यरुशलेमला वेढा घालण्याच्या तयारीत आहे. इस्राएलाचे लोक गुडघे टेकून गोणताट नेसून, राखेत बसून विलाप करून देवाकडे सहाय्यासाठी याचना करण्याऐवजी ते दंग होऊन आनंद व हर्ष करत होते, ते मेजवाण्या करण्यात गुंग होते.  (वचन 12,13) ​​जणू काही त्यांना ठाऊक होते की ते मरणार आहेत, म्हणून त्यांचे विचार असे असावे की चला, धमाकेदारपणे जाऊ.

लागूकरण:

या कथेत तुम्ही कोण आहात? तुम्ही देवाच्या दासाचे किंवा दासीचे जीवन जगता का, जे तुमच्या पदामुळे तुम्ही जे इतर पाहू शकत नाहीत ते पाहू शकता का? का तुम्ही असे आहात की ज्याला स्वत:साठी कोणतीही आशा उरलेली नाही आणि म्हणून तुम्ही बोलता आणि असे जगता की देवाला सहय्यासाठी याचना करण्याचे काही कारण नाही. कारण तुम्ही तसेही हरणार आहेत? होशेया पहिल्या लोकसमुदायात होता. तो “दृष्टांताचे खोरे” यामध्ये होता, जिथे त्याला बाहेरून काय येत आहे हे माहित होते, परंतु त्याचा दृष्टीकोन त्या वेड्या लोकांप्रमाणे होता ज्यांनी शत्रूला तर पाहिले होते पण ते विसरले होते की त्यांच्यावर प्रेम करणारा देव त्यांच्याजवळ आहे. ते विसरले होते की जर त्यांनी पश्चात्ताप केला असता आणि त्याला आरोळी मारली असती तर त्याने शत्रूला नक्कीच माघारी लावले असते. त्यामुळे होशेय घाबरलेला नव्हता. त्याचा दृष्टांत भविष्यासाठी एक दृष्टीकोन असलेला दृष्टांत होता, अंताचा नाही. कधीकधी छतावरून उतरणे आणि “दृष्टान्त खोऱ्यात” खाली उतरणे चांगले असते, जिथे तुम्ही खरोखर काय घडत आहे ते पाहू शकता आणि तुम्हाला तुमचा देव परमेश्वर याच्याशिवाय कोणाचीच भीती नसते म्हणून केवळ देव, परमेश्वर याशिवाय कोणालाच घाबरू नका!

प्रार्थना:

प्रिय येशू,

आज सकाळी माझ्या स्वतःच्या “दृष्टान्ताच्या खोऱ्यातून” मी पाहत आहे की, मला तुझ्याशिवाय कोणाची भीती नाही. प्रभु, तू नेहमीच माझा देव आहेस आणि नेहमी असणार. त्यामुळे, मी दिवसभर आणि प्रत्येक क्षणी तुझ्या दर्शनात उत्सूक राहीन! येशुच्या नावात आमेन.