वचन:
2 इतिहास 33:15
मग त्याने अन्य देव व मूर्ती परमेश्वराच्या मंदिरातून काढून आणि परमेश्वराच्या मंदिराच्या पर्वतावर व यरुशलेमेत केलेल्या सर्व वेद्या काढून नगराबाहेर फेकून दिल्या.
निरीक्षण:
यहूदाच्या इतिहासातील सर्व राजांपैकी मनश्शे हा कदाचित सर्वात वाईट होता. त्याने 55 वर्षे राज्य केले, आणि तो एक अधम माणूस होता. त्याने बाल सारख्या परकीय दैवतांची सर्व उच्च पूजेची ठिकाणे उभारली आणि चेटकिणींचा सल्ला घेतला. त्याने आपल्या मुलांना मनुष्य यज्ञ म्हणून अग्नीत जाळले जेणेकरुन माणसांच्या हातांनी बनविलेल्या देवतांनी त्याचे ऐकावे. देव म्हणाला, “मी तुला अश्शूरच्या राजाने तुझ्या नाकात अंगठी घालून बाबेलास बंदिवान बनवायला लावीन!” जेव्हा हे घडले तेव्हा मनश्शेने पश्चात्ताप केला आणि देवाकडे दयेची याचना केली. तेव्हा परमेश्वराने त्याची हाक ऐकली. देवाने त्याला यरुशलेमला परत आणले, जिथे त्याने अक्षरशः देवाचा खरोखर नीतिमान माणूस म्हणून काम केले. जर हे प्रेषितांच्या पुस्तकात घडले असते, तर आपल्याला असे म्हणायचे असते की, “मनश्शे वाचला!”
लागूकरण:
जुन्या करार देवाची कृपा अशा प्रकारे दाखवते जी केवळ उल्लेखनीय आहेत. बहुतेक आधुनिक काळातील, तसेच जुने धर्मशास्त्रज्ञ मान्य करतात की आपन मनश्शेला स्वर्गात पाहण्याची शक्यता आहे! पवित्र शास्त्र सांगते की मनश्शेने आपल्या देशताल पुरुषांतील बऱ्याच जनांना मारले की यरुशलेमच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत रक्त वाहत होते. (२ राजे २१:१६) तरीसुद्धा, असे दिसते की देवाने त्याला क्षमा केली आणि नवीन कराराच्या परिभाषेत, “मनश्शे वाचला!” असे दिसते. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. असे काय आहे ज्यासाठी तुम्ही स्वतःला माफ करणार नाही? मला अनेकदा असे आढळून येते की, देव आपल्या पापांसाठी आणि अपयशांसाठी आपल्याला क्षमा करण्यास तयार आहे, परंतु आपण स्वतःला क्षमा करत नाही. देव तुम्हाला क्षमा करण्यापासून रोखेल असे तुम्ही काय करू शकले असते? लक्षात ठेवा, जर देवाने मनश्शेला क्षमा केली तर तो तुम्हाला नक्कीच क्षमा करू शकेल. तुमच्या पाप आणि अपयशावर देवाला खेळविणे थांबवा. लक्षात ठेवा, “मनश्शे वाचला!”
प्रार्थना:
प्रिय येशू,
या समयी, मी उत्साहित आहे. मी उत्साहित आहे कारण जर तू मनश्शेला क्षमा करू शकतो, तर तू मला आणि माझ्या जवळच्या लोकांनाही नक्कीच क्षमा करशील, आणि त्यांनी जे आज ही पोस्ट वाचत आहे. तुझ्यासाठी काहीही अवघड नाही. माझा देव करू शकत नाही असे काहीही नाही याबद्दल मी कृतज्ञ आहे. येशुच्या नावात आमेन.