
ज्याप्रमाणे जगाची निर्मिती होण्यापूर्वीच, ख्रिस्तामध्ये त्याने [आपल्यावरील प्रेमापोटी] आपल्याला निवडले [म्हणजेच स्वतःसाठी खास आपली म्हणून निवड केली], जेणेकरून आपण त्याच्या दृष्टीने पवित्र (त्याच्यासाठी समर्पित व वेगळे केलेले) आणि निर्दोष म्हणजेच त्याच्यासमोर प्रेमात असताना कोणत्याही दोषारोपास पात्र न ठरणारे असावे.
देव त्याच्या वचनाद्वारे आपल्याला सांगतो की तो आपल्यावर किती प्रेम करतो आणि आपल्याला कसे स्वीकारतो; आपण भविष्यात ज्या काही चुका करणार होतो त्या त्याला आधीच माहित असूनही, त्याने मुद्दाम आपल्याला स्वतःसाठी निवडले आहे. आपण हे वाचतो, पण हे सत्य स्वीकारणे आपल्याला कठीण जाते.
कारण, जो देव परिपूर्ण आहे, तो आपल्या अपूर्णतेसह आपल्यावर कसा काय प्रसन्न होऊ शकेल? तो तसे करू शकतो कारण आपण ‘कोण आहोत’ आणि आपण ‘काय करतो’ यातील फरक तो जाणतो. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे म्हणून आपण देवाची मुले आहोत. कदाचित आपण नेहमी त्याच्या इच्छेनुसार वागत नसू, तरीही आपण त्याची मुले राहणे कधीच थांबत नाही आणि तोही आपल्यावर प्रेम करणे कधीच थांबवत नाही.
हे पित्या, मला निवडल्याबद्दल आणि माझ्यावर बिनशर्त प्रेम केल्याबद्दल तुझे आभार. जेव्हा मी अपयशी ठरतो, तेव्हाही तुझे प्रेम पूर्णपणे स्वीकारण्यास आणि मी नेहमीच तुझे मूल आहे हे लक्षात ठेवण्यास मला मदत कर.