तुमच्या दुःखात देवावर विश्वास ठेवा

तुमच्या दुःखात देवावर विश्वास ठेवा

तो भग्न हृदयाच्या लोकांना बरे करतो आणि त्यांच्या जखमा बांधतो . . .

आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींसाठी देवावर विश्वास ठेवणे तुलनेने सोपे असते, परंतु जेव्हा आयुष्यात दुःख येते, तेव्हा देवावर विश्वास ठेवण्याचे काय? तुमच्या वेदनांच्या बाबतीतही तुम्ही देवावर विश्वास ठेवण्यास तयार आहात का? जेव्हा मी दुःखात असतो, तेव्हा माझ्या श्रद्धेची परीक्षा होत असल्याचे मला जाणवते. आपल्याला दुःख आवडत नाही आणि सहसा ते का आले, हेही आपल्याला समजत नाही.

अशा परिस्थितीत, त्या दुःखाच्या पलीकडे पाहणे तर दूरच, पण त्यातून काहीतरी चांगले घडू शकेल, यावर विश्वास ठेवणेही कठीण वाटते. मात्र, देव असे वचन देतो की तो आपल्या जखमा भरून काढेल आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवत राहिलो, तर तो आपल्या दुःखाचे रूपांतर चांगल्या गोष्टींत करेल (उत्पत्ती ५०:२०). जर तुम्ही सध्या दुःखात असाल, तर मी तुम्हाला प्रोत्साहित करतो की, तुम्ही तुमचे दुःख देवाच्या चरणी अर्पण करा आणि त्याला विनंती करा की, त्याने त्या दुःखाचा वापर गौरवासाठी करावा आणि तुमच्या भल्यासाठी त्याचे रूपांतर चांगल्यात करावे!

हे प्रभू, जेव्हा आयुष्यात कठीण प्रसंग येतात, मला वेदना होतात आणि त्याचे कारण मला समजत नाही, तेव्हा माझ्या या दुःखाच्या काळातही मला तुझ्यावर विश्वास ठेवण्यास मदत कर. कृपया माझ्या दुःखाचे रूपांतर अशा काही चांगल्या गोष्टींत कर, ज्यामुळे तुझे गौरव होईल! येशुच्या नावात आमेन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *