वचन:
स्तोत्र 134:2
पवित्रस्थानाकडे वळून आपले बाहू उभारा, आणि परमेश्वराचा धन्यवाद करा;
निरीक्षण:
मंदिरात, विशेषत: रात्रीच्या वेळी कसे राहावे याविषयी स्तोत्रकर्त्याद्वारे प्रभूने दिलेल्या या सूचना होत्या. तरीही, मला असे वाटते की आजच्या आधुनिक काळात आपल्या सर्वांसाठी हे एक सामान्य वचन आहे की परमेश्वराकडे कसे जावे, विशेषत: परमेश्वराच्या घरात, परंतु आपल्या स्वतःच्या राहण्याच्या ठिकाणीही आपण कसे राहावे याबद्दल हे आहे. आपल्या महान आणि पवित्र देवाला शरण जाऊन आपले हात वर करणे. शिवाय, ही एक आज्ञा आहे आणि सूचना नाही.
लागूकरण:
चला आपण केवळ आठवड्याच्या शेवटी चर्चमधील उपासनेला चिकटून राहू या. मी प्रथम काही प्रश्न विचारतो. तुम्ही नियमितपणे उपस्थित राहता का? हे एक काम आहे का? जर तुमची उत्तरे होय आणि नाही असतील, तर अंतिम प्रश्न असेल, “तुम्ही त्याच्या आज्ञेचे पालन करत आहात का?” बरेच लोक चर्चमध्ये जातात आणि जाण्यासाठी उत्सुक असतात, तरीही एकदा दारात पाऊल टाकले की, मंदिरात जाण्याचा उद्देश आणि कारण तिथेच संपते. अचानक, तिथे आणखी कोण कोण आहे याबद्दल सर्व काही सामावलेले असते. किंवा आपण असा विचार करतो की पाळकसाहेबांणी तरी पाहावे. किंवा, आजचा सर्जनशील क्षण कसा असेल, किंवा सर्जनशील क्षण असेल का, किंवा गेल्या आठवड्यात होत तसंच असेल का? यापैकी कोणताही विचार देवाच्या घरी आपल्या उपस्थितीचे कारण ठरवत नाही. चर्चमधील उपस्थितीचे मुख्य कारण आणि उद्देश म्हणजे सामुदायितरीतीने आपल्या जीवनात त्याचे स्थान कबूल करणे. त्याद्वारे दिसते की आपण विश्वासणारे एकत्र आहोत. आणि दर आठवड्याला देवाच्या उपासनेसाठी हात उचलून आपल्या महान देवाला आपण हे सांगत असत आहोत की “मी स्वत:चा मालक नाही, केवळ तूच माझा मालक व प्रभू आहेस!” आणि मी तुला शरण जात आहे. तर “तुम्ही त्याच्या आज्ञेचे पालन करत आहात का?”
प्रार्थना:
प्रिय येशू,
या समयी, मला आठवण करून दिली जात आहे की मी पवित्रस्थानात आणि माझ्या स्वतःच्या राहण्याच्या ठिकाणी माझे हात वर करून तुझी आराधना करणे महत्वाचे आहे. “तू माझा परमेश्वर आहेस!” ते सत्य आहे! इतरांना काय वाटेल याची मला पर्वा नाही! मी तुझा आहे! येशुच्या नावात आमेन.