“येशूकडे तुम्हाला जे काही हवे ते सर्व आहे”

"येशूकडे तुम्हाला जे काही हवे ते सर्व आहे"

“येशूकडे तुम्हाला जे काही हवे ते सर्व आहे”

वचन:

प्रेषित 3:6

मग पेत्र म्हणाला, “माझ्याजवळ सोनेरुपे काही नाही; पण जे आहे ते तुला देतो; नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग.”

निरीक्षण:

अर्थात, ही पेत्र आणि योहान एक दिवस प्रार्थनेसाठी ‘सुंदर’ नावाच्या दरवाज्याहून मंदिरापर्यंत चालत जाण्याची प्रसिद्ध कथा आहे. ते मंदिराजवळ आले तेव्हा जन्मापासून अपंग असलेल्या एका माणसाने त्यांच्याकडे पैसे मागितले.  पेत्र त्याला म्हणाला, “माझ्याकडे सोने किंवा चांदी नाही, पण माझ्याकडे जे आहे त्याची तुला गरज आहे.” त्याच क्षणी, पेत्राने त्याला येशूच्या नावाने उठून चालण्याची आज्ञा दिली. आणि, तो उठला आणि चालू लागला, असे शास्त्र सांगते.

लागूकरण:

अर्थात, मी येथे पेत्राच्या शब्दांची व्याख्या केली आहे, परंतु सत्य हे आहे की जेव्हा पेत्राने येशूच्या नावाने त्या माणसाला बरे केले तेव्हा खरोखरच त्या माणसाला त्याचीच गरज होती. जेव्हा तुम्ही जन्मापासून पांगळे असता आणि आता तुम्ही चालू लागता, तेव्हा तुम्हाला संपूर्ण नवीन जीवन मिळाले असे वाटायला लागते! तो आता लंगडा माणूस राहिला नव्हता; तो चमत्कारी माणूस होता. त्याच्याबद्दल लोकांची धारणा बदलली. जे लोक त्याच्याकडे लक्ष देत नव्हते ते आता त्याच्याकडे आश्चर्याने पाहत आहेत, आज आपल्याला कशाची गरज आहे? मी असे विचारतो कारण “येशू काल, आज आणि अनंतकाळ सारखाच आहे!” (इब्री. 13:8) त्याने दोन हजार वर्षांपूर्वी दरवाज्या जवळील लंगड्या माणसासाठी जे केले ते आजही तुमच्यासाठी करू शकतो.  त्यामुळे आत्ता तुम्हाला कशाचीही असो, “येशूकडे तुम्हाला जे काही हवे ते सर्व आहे.”

प्रार्थना:

प्रिय येशू,

मी या समयी आभारी आहे की मला आवश्यक असलेले सर्व तुझ्याकडे आहे. कारण तू हे आधीच माझ्यासाठी केले आहे, मला माहित आहे की तू ते पुन्हा करशील. तुझ्या मदतीने मला हवे ते मला प्राप्त होईल, जेव्हा मला गरज असेल तेव्हा मी तुला प्रथम हाक मारेन. येशुच्या नावात आमेन.