वचन:
1 शमुवेल 17:11
शौल व सर्व इस्राएल यांनी या पलिष्ट्याचे हे शब्द ऐकले तेव्हां त्यांचे धैर्य खचलें आणि ते भयभीत झाले.
निरीक्षण:
तुम्ही ही कथा या आधी ऐकली असावी, परंतु जर तुम्ही ऐकली नसेल, तर ही गल्याथ नावाच्या दहा फूट उंच पुरुषाची कथा आहे. बायबल म्हणते की तो इस्राएलाशी लढण्यासाठी बाहेर पडला होता आणि त्याच्याशी लढण्यासाठी समान शारीरिक शक्ती असलेल्या माणसाचे आवाहण तो करत होता. गल्याथ म्हणाला की जो कोणी इतरास ठार करतो तर तो दुसऱ्या राष्ट्राचा गुलाम होईल. बायबल म्हणते की जेव्हा इस्राएल लोकांनी या धिप्पाड पुरुषाला पाहीले तेव्हा इस्राएल लोक घाबरले. दुसऱ्या शब्दांत, ते “भीतीने वितळले!”
लागूकरण:
असे अनेक लोक आहेत जे निराशेत राहतात आणि काही बाबतीत ते घाबरून जातात. ते त्यांच्या जीवनात येशूच्या हाकेला पूर्णपणे स्वीकारण्यास असमर्थ आहेत कारण ते म्हणजे “भीती याने वितळले” आहेत. आपल्या आत्म्याचा शत्रू सैतान. प्रत्येक विश्वासणाऱ्याला हे माहीत आहे की लढाई नेहमीच तुमच्या मनासाठी असते. आणि लढाई सहसा सैतानाने आणलेली भीती आणि येशूने प्रचारित केलेल्या विश्वासाभोवती केंद्रित असते. जेव्हा आपण जगतो आणि विश्वासाने चालतो तेव्हा नेहमीच ही आशा असते, की कोणत्याही परिस्थितीत मला काहीही झाले तरी, “मला माहित आहे की माझा देव माझ्यासाठी येईल!” जर तुम्ही “भीतीने वितळले” असाल तर, मी तुम्हाला आज बदलण्यास प्रोत्साहित करतो. येशू तुम्हाला विश्वासाने चालण्यास आणि जगण्यास मदत करेल!
प्रार्थना:
प्रिय येशू,
मी या समयी तुझा खूप आभारी आहे की तू मला जे दिसते त्याप्रमाणे नव्हे तर विश्वासाने जगण्यास आणि चालण्यास शिकवले. मी आज माझ्या मित्रासाठी प्रार्थना करत आहे की तू त्यांनाही सहाय्य कर आणि सर्व भयापासून आमचे रक्षण कर येशूच्या नावात आमेन.