वचन:
निर्गम 20:20
तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिऊ नका. कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय तुमच्या मनात राहून तुम्ही पाप करू नये ह्यासाठी देव आला आहे.
निरीक्षण:
मोशेला पर्वतावर परमेश्वराकडून आज्ञा मिळाल्यानंतर इस्राएल लोकांनी त्याला प्रतिसाद दिला होता. सिनाय येथे ते घाबरले. मोशे त्यांना म्हणाला घाबरू नका, देव तुमची परीक्षा पाहत आहे जेणेकरून तुम्ही मनुष्यापेक्षा देवाचे भय मानावे. आणि, जर तुम्ही तसे केले तर तुम्ही पाप करण्यापासून दूर राहाल. तो हे सत्य प्रस्थापित करत होता की पापापासून पळून जाण्याने खरोखरच “मनुष्याच्या भयापेक्षा देवाचे भय वाटते” .
लागूकरण:
त्यावेळच्या इस्राएलासाठी आणि आजच्या युगाच्या अंतिम विश्लेषणात, सत्य हे आहे की, “मनुष्याच्या भीतीचा” जवळजवळ नेहमीच पराभव झाला आहे. हो खरचं, अशा काही घटना घडल्या आहेत जेव्हा संजीवनाद्वारे राष्ट्राचा ताबा घेतला गेला आणि काही काळ लोक परमेश्वराच्या भयात जगले. पण ते अनुभव फार कमी आहेत. तुम्ही विचाराल का? मला पूर्ण खात्री नाही, पण मला वाटते की आपण देवाला पाहू शकत नाही या वस्तुस्थितीशी संबंधित आहे, त्याच वेळी, मनुष्य दररोज आपल्या चेहऱ्याकडे पाहतो. मनुष्य आपल्याला धमकावण्याचा प्रयत्न करतात. आपल्या सहकाऱ्यांच्या दबावामुळे आपण घाबरून जातो आणि त्यामुळे आपण पाप करतो. दुसरीकडे, आम्हाला असे वाटते की परमेश्वराची ओढ आपल्याला त्याच्या दिशेने खेचत आहे, तरीही आपण त्याला पाहू शकत नसल्यामुळे, आपण असे मानतो की तो आपल्याला त्याच्यारकडे खेचून घेत नाही. मी वर म्हटल्याप्रमाणे, पाप करणे किंवा न करणे हे तुम्हाला कोणाची भीती वाटते यावरून समजते. ते बरोबर आहे! हे नेहमी “देवाचे भय विरुद्ध मनुष्याचे भय” याबद्दल आहे.
प्रार्थना:
प्रिय येशू,
माझ्या अंतःकरणात मला तुझे भय वाटते. तुझ्याबद्दलच्या भयामुळे मी पापापासून दूर राहण्यास सक्षम होतो. तुझे भय मला नेहमीच सांभाळून ठेवते व पाप करण्यापासून रोखते. प्रभू मला तुझ्या भयाची जाणीव सर्वदा असू दे, येशुच्या नावात आमेन.