“तो पुढे जात राहीला”

"तो पुढे जात राहीला"

“तो पुढे जात राहीला”

वचन:

मत्तय 14:14
मग येशूने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला; तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला व त्यांच्यातील दुखणेकर्‍यांना त्याने बरे केले.

निरीक्षण:

येशूने नुकतेच ऐकले होते की त्याचा प्रिय मित्र आणि चुलत भाऊ, बाप्तिस्मा करणारा योहान, यास राजा हेरोद मांडलिकाने शिरच्छेद करून मारून टाकले. त्वरीत बायबल आम्हास सांगते की येशू नावेत बसून एकांत ठिकाणी गेला, परंतु लोकसमुदायाने तो कोठे आहे हे ऐकले आणि त्याच्या मागे सर्व समुदाय गेला. जेव्हा त्याची होडी किनाऱ्यावर पोहोचली तेव्हा तेथे बरेच लोक पीडलेले होते, मग येशूने आजारी लोकांना बरे करण्यास सुरुवात केली. त्याचा मित्र आणि नातेवाईक बाप्तिस्मा करणारा योहान यास गमावल्याबद्दल शोक करण्याची वेळ त्याच्याकडे नसल्यामुळे, “तो पुढे जात राहिला.”

लागूकरण:

असे नाही की जेव्हा आपल्या आप्तातील किंवा कोणी जवळचा मित्र मरण पावला तर त्याबद्दल शोक करू नये. परंतू येशूबद्दल असे होते की त्याच्या पाठीमागे आलेला जमाव त्यांची न संपणाऱ्या गरजा जसे दु:ख, पीडा या गोष्टींमुळे येशूला काही तासासाठी आपल्या बंधुबद्दल शोक करणे अशक्य झाले. म्हणून “तो पुढे जात राहीला” येशूला त्याचा वेळापत्रक नक्कीच माहीत असेल. निश्चितपणे, त्याला माहित होते की घड्याळ पुढे जात आहे आणि त्याच्या कार्याच्या आवश्यकतेमुळे सतत थांबणे आणि विचार करणे अशक्य होईल. अनेकदा आपण वाचतो की येशू प्रार्थना करण्यासाठी गर्दीपासून दूर जात असे. त्यानंतर, “तो पुढे जात राहिला.” आम्ही येशू नाही. आपल्या भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी आपल्याला विश्रांतीची आवश्यकता असते. आमच्यासाठी हे अनिवार्य आहे की आम्ही प्रत्येक आठवड्यात एक दिवस थांबतो आणि आपला शब्बाथ घेतो आणि पुरर्वित्त करतो. जरी केवळ एका दिवसासाठी आपण विराम बटन दाबतो तरी “आपण पुढे जात राहू शकतो”.

प्रार्थना:

प्रिय येशू,

मी तुझ्या समान नाही हे लक्षात ठेवण्यास मला सहाय्य कर. माझे हे शरीर विश्रांतीशिवाय क्षीण होते. माझ्या सर्वात कठीण काळातही मला आराम करण्यास सहाय्य कर. मला तुझ्या सामर्थ्याने भर, मला शक्ती दे की प्रत्येक काम करण्यास मला उल्लास यावा व प्रत्येक काम मी पुर्ण शक्तीने करावे कारण मला तुझ्या गौरवासाठी “पुढे जात राहायचे आहे”.