Author: Sunil Kasbe

"तू मला ओळखतोस"

“तू मला ओळखतोस”

वचन: स्तोत्र 139:1हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस, तू मला ओळखतोस. निरिक्षण: दावीद राजाच्या राज्यात फक्त प्रजा होती. त्याने सर्वशक्तिमान देवाशिवाय कोणालाच नमन केले नाही. तो त्याच्या स्वर्गीय पित्याविषयी इतका आश्चर्यचकित झाला की त्याने सतत त्याची स्तुती केली आणि अशा शब्दांत त्याची उपासना केली ज्याचा आपल्यापैकी बरेच जण क्वचितच विचार करतात. या उतार्‍यात, तो त्यास आपल्या आकलनाच्या पातळीवर आणतो आणि म्हणतो, “तू मला ओळखतोस.” लागूकरण: जेव्हा आपण एका देशात राहतो, तेव्हा आपली ओळख ही एका नंबर द्वारे तयार ह [...]

Read More
मत्तय 15:11

तुमचे भाषण तुम्ही कोण आहात यास प्रकट करते

वचन: मत्तय 15:11 जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवत नाही; तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळवते.” निरीक्षण: शास्त्राच्या या उतार्‍याचा तुम्ही काय खाता व पीता याच्याशी  फारसा संबंध नाही; त्याऐवजी, तुमच्या बोलण्याद्वारे तुमच्या तोंडातून काय बाहेर येते याबद्दल आहे. कारण तुमच्या तोंडून जे काही बोलण्याद्वारे बाहेर पडते त्याद्वारे इतरांना तुम्ही कसे आहात हे समजते. म्हणूनच असे म्हटले आहे की, “तुमचे भाषण तुम्ही कोण आहात हे प्रकट करते!” लागूकरण: जेव्हा खरोखर मुक्त जगण्याचा विचार येतो तेव्हा हृदयाच [...]

Read More
"तो पुढे जात राहीला"

“तो पुढे जात राहीला”

वचन: मत्तय 14:14मग येशूने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला; तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला व त्यांच्यातील दुखणेकर्‍यांना त्याने बरे केले. निरीक्षण: येशूने नुकतेच ऐकले होते की त्याचा प्रिय मित्र आणि चुलत भाऊ, बाप्तिस्मा करणारा योहान, यास राजा हेरोद मांडलिकाने शिरच्छेद करून मारून टाकले. त्वरीत बायबल आम्हास सांगते की येशू नावेत बसून एकांत ठिकाणी गेला, परंतु लोकसमुदायाने तो कोठे आहे हे ऐकले आणि त्याच्या मागे सर्व समुदाय गेला. जेव्हा त्याची होडी किनाऱ्यावर पोहोचली तेव्हा तेथे बरेच लोक पीडलेले होते, [...]

Read More
समर्थन

समर्थन

वचन: स्तोत्र 140:12परमेश्वर दीनाच्या पक्षाचे, दरिद्र्यांच्या वादाचे समर्थन करील, हे मला ठाऊक आहे. निरीक्षण: इस्त्राएलाच्या इतिहासातील सर्वांत महान राजा दावीद पुन्हा एकदा, “समर्थन” या शब्दास घेऊन येतो. तो देवाच्या मनासारखा मनुष्य होता. दाविदाप्रमाणे कोणत्याही राजाने देवाच्या प्रेमाची कदर केली नाही, या राजाला होती तेवढी कोणत्याही राजाला देवाच्या सान्निध्यात राहण्याची इच्छा नव्हती. राजा दावीदासारखा “समर्थन” या शब्दाबद्दल कोणत्याही इस्राएली राजाने कधीही विचार केला नाही. लागूकरण: गरीब आणि गरजू लोकांव [...]

Read More
ते त्याने भरलेले आहेत

ते त्याने भरलेले आहेत

वचन: मत्तय 12:34अहो सापाच्या पिलांनो, तुम्ही वाईट असता तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार. निरीक्षण: शब्बाथ दिवशी खरोखरच चांगल्या गोष्टी करण्याची येशूची प्रवृत्ती होती आणि यामुळेच तो नेहमी परुशांसोबत अडचणीत येत असे. या प्रसंगी, त्याने शब्बाथ दिवशी एका मनुष्याला बरे केले होते, आणि म्हणून परुश्यांनी असा दावा केला की त्याने नियमशास्त्राचे उल्लंघन केले. सापांच्या पिल्लांनो जे सत्य बोलत नाही असे म्हणून त्याने त्यांना संबोधले. तो म्हणाला, जे [...]

Read More
खराब मुल्यांकन

खराब मुल्यांकन

वचन: 1 शमूवेल 27:12आखीशाने दाविदाच्या बोलण्यावर भरवसा ठेवून म्हटले, “ह्याने इस्राएल लोकांना आपला अगदी वीट येईलसे केले आहे; तर आता हा निरंतर आपला दास होऊन राहील.” निरीक्षण: शौल राजा असताना दावीदाचे जीवन इतके कठीण झाले होते की त्याने माका राजाचा मुलगा आखीश याच्या अधिपत्याखाली असलेल्या सिकलाग नावाच्या गावात जाऊन पलिष्ट्यांमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. दावीदाने आखीशाशी एकनिष्ठ राहण्याचे वचन दिले आणि तो शौलापासून सुरक्षित राहिला. दाविदास शत्रूमध्ये राहणारा इस्राएलाचा गुप्तहेर म्हटले जात असे. तो आखीशा [...]

Read More
येशू मला तुझी गरज आहे.

येशू मला तुझी गरज आहे

वचन: स्तोत्र 63:1 हे देवा, तू माझा देव आहेस; मी आस्थेने तुझा शोध करीन; शुष्क, रुक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. निरीक्षण: येथे दावीद राजाने देवाची त्याच्या जीवनात असलेल्या नितांत गरजेवर भर दिला. तो त्याच्या जीवनात असलेल्या देवाच्या गरजेला जणू एखाद्या वाळवंटात असल्यासारखे आणि कुठेही पाणी नसल्यासारखे वर्णन करतो. तो म्हणतो माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे! मी  - माझ्या संपूर्ण अस्तित्वात, माझ्या आयुष्यात तुझ्या उपस्थितीस [...]

Read More

शब्द मात्र बोला

वचन: मत्तय 8:8तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, “प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही; पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. निरीक्षण: ही रोमी सैनिकाची कथा आहे जो एक विधर्मी होता तरी ही देवभीरू मनुष्य होता. तो येशूकडे आला आणि म्हणाला, “माझ्या घरी एक चाकर आहे जो अत्यंत आजारी आहे. येशू म्हणाला मी तुझ्या घरी यावे, हे तुला आवडेल का? तो मनुष्य म्हणाला“, शब्द मात्र बोला. कारण मी अधिकाराच्या अधीन आहे आणि माझेही लोक माझ्या अधिकाराखाली आहेत आणि मी त्यांना काहीतरी करण्यास सांगितल [...]

Read More

प्रशस्त स्थळ

वचन: स्तोत्रसंहिता 31:8तू मला वैऱ्याच्या कोंडीत सापडू दिले नाही; माझे पाय तू प्रशस्त स्थळी स्थिर केलेस. निरीक्षण: राजा दावीद आपल्या प्रिय इस्राएल राष्ट्राकरता किती भार वाहत होता याची त्याला नेहमी जाणीव होती. या वचनात, तो पुन्हा एकदा शत्रूंच्या वर्चस्वामुळे त्रस्त झाला आणि तो परमेश्वराला म्हणाला, “तू माझ्या शत्रूंना माझ्यावर चढून जाऊ दिले नाहीस आणि मला त्यांच्या स्वाधीन होऊ दिले नाहीस, उलट तू माझे पाय अशा प्रशस्त स्थळी स्थिर केले आहेस जेथे , "मोकळी जागा!" आहे. लागूकरण: तुमच्यासमोर येणार्‍या आव्हा [...]

Read More

याचा विचार करा

वचन: मत्तय 6:27 चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? निरीक्षण: प्रभूच्या प्रसिद्ध “पर्वतावरील प्रवचन”  या भागात, त्याने या चिंतेच्या समस्येबद्दल सांगितले. येशूला त्याच्या अनुयायांनी कशाचीही चिंता करावी असे कधीही वाटले नाही. त्याचा विश्वास होता की जर त्यांचा पूर्ण विश्वास त्याच्यावर असेल, तर ते चांगले होईल कारण त्याच्या मनात आपल्या सर्वांबद्दल हित आहे. येथे त्याने शिष्यांशी तर्क केला आणि म्हणाला, “चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्या [...]

Read More