Blog

“तुम्हाला कोण फसवत आहे?”

“तुम्हाला कोण फसवत आहे?”

वचन: 2 करिंथ 11:14 ह्यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण सैतानही स्वत: तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. निरीक्षण: प्रेषित पौलाने या अध्यायाचा उपयोग खोटे शिक्षण आणि सुवार्तेच्या शिक्षकांच्या कार्याचा निषेध करण्यासाठी केला होता. त्याने करिंथ येथील मंडळीला सांगितले की तो आणि त्याचे सहकारी कधीही पगारासाठी त्यांच्या शहरात आले नाहीत तर केवळ येशूची सुवार्ता सांगण्यासाठी आले. तो त्यांना म्हणाला की त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सुवार्तेचे सत्य मांडले आहे. पण आता या इतर भोंदूंचे ऐकून त्यांची फसवणूक हो [...]

Read More
“आपली प्रतीती पाहा!”

“आपली प्रतीती पाहा!”

वचन: 2 करिंथ 13:5 तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीती पाहा, येशू ख्रिस्त तुमच्या ठायी आहे असे तुम्ही स्वतःसंबंधाने समजता ना? नाहीतर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही. निरीक्षण: येथे प्रेषित पौल करिंथ येथील मंडळीला लिहिलेल्या दुसऱ्या पत्राचा शेवट करतो, आणि ते प्रत्येकजण आध्यात्मिकरित्या कोठे आहे याची वैयक्तिक परीक्षा घेण्याबद्दल  त्यांना लिहितो! ते विश्वासाने खंबीरपणे उभे आहेत की नाही हे त्यांना त्यांना परीक्षेत उतरल्यावर समजते. पौल म्हणाला की जेव्हा त्यांना सम [...]

Read More
“सरळ असलेल्यास त्याचे दर्शन होईल”!

“सरळ असलेल्यास परमेश्वराचे दर्शन होईल”!

वचन: स्तोत्र 11:7 कारण परमेश्वर न्यायी आहे; त्याला नीतिमत्त्व प्रिय आहे; सरळ असलेल्याला त्याचे दर्शन होईल. निरीक्षण: स्तोत्रकर्ता आपल्या महान देवाबद्दल एक अद्भुत विधान करतो. त्याने जे सांगितले त्याबद्दल काही शंका नाही, आणि खरोखर ही “तीन चिन्हे” आहेत जी आपल्या प्रेमळ तारणाऱ्याकडे आहेत. प्रथम, आपला देव नीतिमान आहे! दुसरे, आपल्या देवाला न्याय आवडतो! आणि तिसरे, “सरळ असलेल्यास परमेश्वराचे दर्शन होईल”! लागूकरण: ज्या देवाची आपण सेवा करतो त्याच्याशी अनेक चिन्हे जोडलेली आहेत. तरीही, आज आम्ही फक्त तीन चिन [...]

Read More
"आनंदाने भरलेला मनुष्य"

“आनंदाने भरलेला मनुष्य”

वचन 2 शमुवेल 6:14दावीद सणाचे एफोद कंबरेस वेष्टून परमेश्वरासमोर आवेशाने नृत्य करत चालला. निरीक्षण: दावीद राजाची ही विलक्षण कथा आहे ज्यामध्ये वस्त्र काढून परमेश्वरासमोर पुर्ण आवेशाने नाचत होता. तो इतका उत्तेजित का झाला? देवाची उपस्थिती असलेला कराराचा कोश हस्तगत करण्यात आला होता आणि तो शत्रूच्या प्रदेशात होता. तथापि, दाविदाला त्यास यरुशलेमेस परत आणण्यास यश आले आणि म्हणून तो त्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवसांपैकी एक दिवस होता. दाविद हा “आनंदाने भरलेला मनुष्य” होता! लागूकरण: तुमचे हृदय आनंदाने क [...]

Read More
"मी वयोवृध्द झालो तरीही!"

“मी वयोवृध्द झालो तरीही!”

वचन: स्तोत्र 71:18 भावी पिढीला तुझे बाहुबल विदित करीपर्यंत पुढच्या पिढीतील सर्वांना तुझ्या पराक्रमाचे वर्णन करीपर्यंत, मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी, हे देवा, मला सोडू नकोस. निरीक्षण: दाविद राजाने हे विधान सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी केले होते. तो म्हणाला, “मी वयोवृध्द झालो तरी,” मी हा जीवनाचा आणि आशेचा हा संदेश येणाऱ्या पिढीला आणि त्यानंतरच्या पिढीला देखील सांगण्यास कधीही थांबू नये म्हणून सहाय्य कर. देव प्रीती आहे, आणि देव तुमच्यावर प्रेम करतो हा संदेश प्रत्येकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त् [...]

Read More
"येशू माझे आश्रयस्थान आहे!"

“येशू माझे आश्रयस्थान आहे!”

वचन: स्तोत्र 32:7 तू माझे आश्रयस्थान आहेस. तू संकटापासून माझे रक्षण करशील; मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढशील. निरीक्षण: इस्राएलाचा परमेश्वर देव याच्याविषयी राजा दाविदाची ही घोषणा होती. त्याने परमेश्वराला प्रार्थना केली आणि म्हणाला, तू माझे आश्रयस्थान आहेस. देव नेहमी शत्रूच्या धोक्यांपासून त्याचे रक्षण करेल या वस्तुस्थितीबद्दल देखील तो बोलला. शेवटी दाविद म्हणाला, “मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढशील.” आपला प्रिय राजा दाविद याच्या शब्दांनी किती सुंदर चित्र रेखाटले आहे. लागूकरण: हे वचन बायबलम [...]

Read More
"त्याबद्दल रडणे थांबवा आणि त्याबद्दल काहीतरी करायला सुरुवात करा!"

“त्याबद्दल रडणे थांबवा आणि त्याबद्दल काहीतरी करायला सुरुवात करा!”

वचन: 2 शमुवेल 13:39 अबशालोमाला भेटायला दावीद राजा फार आतुर झाला; कारण अम्नोन मरून बरेच दिवस झाल्यामुळे त्याचे चित्त शांत झाले होते. निरीक्षण: अबशालोमाने आपला सावत्र भाऊ अम्नोन यास त्याची (अबशालोम) बहीण तामार, जी अम्नोनची सावत्र बहीण होती, तिच्यावर बलात्कार केल्याबद्दल त्याचा खून केला. दाविद राजाने अम्नोनास शिक्षा होईल असे कधीही काहीही केले नाही आणि म्हणून दीर्घ कालावधीनंतर अबशालोमाने आपल्या भावाला ठार मारले. यामुळे दाविदाला आपला बलात्कारी मुलगा अम्नोन मरण पावल्याबद्दल रडू कोसळले. अबशालोम आपल्या [...]

Read More
"कधी कधी ते तुमच्या DNA मध्ये असते!"

“कधी कधी ते तुमच्या DNA मध्ये असते!”

वचन: 1 इतिहास 20:7त्याने इस्त्राएलाची अवहेलना केल्यावरून दाविदाचा भाऊ शिमी ह्याचा पुत्र योनाथान ह्याने त्याचा वध केला. निरीक्षण: या उताऱ्यात इस्राएल लोकांची टिंगलटवाळी करताना पकडलेला माणूस दुसरा कोणी नसून बारा बोटे आणि बारा पायाची बोटे असलेला धिप्पाड पुरुष होता. आम्हाला माहित आहे की तो एक धिप्पाड पुरुष होता कारण तो गथ येथील रहिवासी होता, त्याच ठिकाणाहून गल्याथ देखील आला होता आणि तो धिप्पाड पुरुषांचा देश होता. त्याने इस्राएल लोकांना टोमणे मारले याखेरीज फारसे काही सांगितले जात नाही. त्याने असे केल [...]

Read More
"मला ते करायचे आहे"

“मला ते करायचे आहे”

वचन: 1 इतिहास 18:14 दाविदाने सर्व इस्त्राएलावर राज्य केले’ तो आपल्या सर्व प्रजेशी न्यायाने व नीतीने वागे. निरीक्षण: हा उतारा इस्राएलाचा राजा म्हणून दाविदाच्या कारकिर्दीच्या शेवटपर्यंतच्या वाटचालीला सुरुवात करतो. या वचनात, आपल्याला सांगितले आहे की दावीद  (त्या वेळी) महान लोकांच्या विशाल राष्ट्रावर न्याय आणि नीतीने राज्य करू शकला. आणि जेव्हा तुम्ही हे वाचता, जर तुम्हालाही तसे करू वाटत असेल तर तुम्ही म्हणू शकता, "मला ते करायचे आहे!" याचा अर्थ असा नाही की दाविद राजा व्हायचे आहे किंवा मोठ्या राष [...]

Read More
"तुम्ही प्रथम, पण माझ्या नंतर"

“तुम्ही प्रथम, पण माझ्या नंतर”

वचन: 1 इतिहास 17:1दावीद आपल्या मंदिरात राहू लागला तेव्हा त्याने नाथान संदेष्ट्याला म्हटले, ‘पाहा, मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे, पण परमेश्वराच्या कराराचा कोश कनाथीखाली आहे.” निरीक्षण: जेव्हा जेव्हा आपण हा उतारा वाचतो तेव्हा लहानपणीचा विचार येतो जेव्हा लहान मुले म्हणतात, “तुम्ही आधी जाऊ शकता, पण माझ्या नंतर.”  दावीद राजाने पुर्वी देवासाठी घर बांधण्याचे स्वप्न पाहिले होते, परंतू त्याने प्रथम स्वतःसाठी एक घर बांधले. जेव्हा आपण संपूर्ण कथा वाचतो तेव्हा आपल्याला कळते की स्वतः देवाला घर नको होते [...]

Read More