“आश्चर्यकारक गौरव!”

"आश्चर्यकारक गौरव!"

“आश्चर्यकारक गौरव!”

वचन:

स्तोत्र 8:1

हे परमेश्वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे! तू आपले वैभव आकाशभर पसरले आहेस.

निरीक्षण:

दाविद राजाने लगेच लक्षात घेतले की प्रभू देव यहोवा याचे नाव सर्व पृथ्वीवर थोरय आहे आणि तो आपला प्रभू आहे. इतकेच नव्हे तर त्याने स्वर्गात आपले वैभव प्रस्थापित केले आहे.

लागूकरण:

लहानपणी, मी नियमितपणे “माझ्या वडिलांचा खेळ तुमच्या वडिलांपेक्षा चांगला आहे” हा खेळ खेळत असे. माझे वडील माझ्या मित्राच्या वडिलांपेक्षा वेगवान, बलवान आणि प्रत्येक प्रकारे चांगले होते. निदान माझ्या मते तरी तसे होता. तथापि, जसजसे मी मोठा होत गेलो तसतसे माझ्या लक्षात आले की माझे वडील कमकुवत होत गेले आणि शेवटी ते स्वर्गात गेले. यामुळे माझ्या वडिलांच्या महानतेबद्दलच्या माझ्या भावना कमी होत नाहीत. तथापि, माझ्याकडे एक स्वर्गीय पिता आहे जो केवळ सर्व काळासाठी महानच नाही, तर तो अमर्याद आहे. त्याची महिमा त्याच्या महान विश्वात स्वर्गाच्या सर्वोच्च स्थानावर स्थापित आहे. मी म्हणेन की ते खरचं किती “आश्चर्यकारक गौरव!” आहे. माझा स्वर्गीय पिता सर्व गोष्टीत एक उत्तम पिता आहे.

प्रार्थना:

प्रिय येशू,

तुझ्यामध्ये मी त्या स्वर्गीय पित्याचे प्रेम पाहू शकतो ते खरच अदभुत आहे. पित्याच्या त्या महानतेबद्दल त्याचे गौरव सतत करण्यास मला सहाय्य कर. येशुच्या नावात, आमेन.