वचन:
2 इतिहास 2:11
तेव्हा सोराचा राजा हूराम ह्याने शलमोनाला असे पत्रोत्तर लिहिले की, “परमेश्वराचे आपल्या प्रजेवर प्रेम आहे म्हणून त्याने आपणाला तिच्यावर राजा नेमले आहे.”
निरीक्षण:
जरी हुरमाने इस्त्राएलाच्या देवाचे अनुसरण केले नाही, तरीसुद्धा त्याला आणि त्याच्या लोकांना शलमोनाचा बाप दाविद यांच्या निर्भय नेतृत्वाबद्दल असामान्य आदर होता, त्यांना निश्चितपणे माहित होते की त्यांचा देव सर्वोच्च राज्य करतो. जेव्हा हुरामाने शलमोनाला पत्र लिहिले आणि कबूल केले की इस्राएलाच्या देवाचे खरोखर त्यांच्यावर प्रेम आहे. कारण त्याने शलमोनाला त्यांच्यावर राजा म्हणून नियुक्त केले आहे, तेव्हा तुम्ही असे म्हणाल की, “खरोखर आश्चर्यकारक आहे!”
लागूकरण:
आपण आपले जीवन अशा प्रकारे जगले पाहिजे की आपल्या मित्रांना आणि शेजाऱ्यांना म्हणावं लागेल, “तुमच्या देवाचे माझ्यावर प्रेम आहे, कारण त्याने तुम्हाला माझ्या जीवनात स्थान दिले आहे.”येशू जसा त्यांच्यावर प्रेम करतो तसे त्यांच्यावर प्रेम करून आपण त्यांच्या जीवनात बदल घडवून आणू शकतो. आपले बरेच मित्र ख्रिस्ताचे अनुसरण करीत नसतात, परंतु ते आपले अनुसरण करत असतात, आणि असा विश्वास आहे की जर त्यांनी आपले अनुसरण केले तर त्यांना ख्रिस्ताचे अनुसरण करावे लागेल कारण त्यांना कळेल की केवळ येशूच आपल्याला सामर्थ्य देतो. आणि रोज प्रत्येक आवाहनास तोंड देण्याची ताकद देतो. जेव्हा तो दिवस येईल की तुमचे प्रभूबरोबर चालणे लोकांना देखील येशूचे अनुसरण करण्यास प्रवृत्त करेल, तेव्हा ते, “खरोखर आश्चर्यकारक असेन!”
प्रार्थना:
प्रिय येशू
आज मी तुला इतरांवर प्रेम करावे म्हणून माझ्यासाठी ताजा अभिषेक मागत आहे. मला तुझ्यावर प्रेम करावयास शिकव आणि अशा लोकांवर प्रेम करण्यास शिकव जे तुला ओळखत नाही. कारण जेव्हा ते माझ्यातील प्रीती पाहतील जी तू दिली आहेस. ते तुझे गौरव करतील. खरोखर आश्चर्य करतील आणि तुला अनुसरण्याचा निश्चय करतील. तू माझ्या जीवनात असे करील म्हणून माझी प्रार्थना ऐकल्याबद्दल धन्यवाद येशूच्या नावात आमेन.