“जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांची येशू काळजी घेतो”

“जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांची येशू काळजी घेतो”

“जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांची येशू काळजी घेतो”

वचन:

नहूम 1:7
परमेश्वर चांगला आहे, विपत्काली तो शरणदुर्ग आहे; जे त्याच्यावर भाव ठेवतात त्यांना तो ओळखतो.

निरीक्षण:

ही निनवेच्या लोकांविरुद्ध एक भविष्यवाणी आहे, ज्यांनी सुमारे 100 वर्षांपूर्वी योनाच्या उपदेशाला नम्र पश्चात्तापाने प्रभुसमोर उपडे पडून प्रतिसाद दिला होता. हे त्यावेळच्या निनवेच्या राजाच्या बाबतीतही खरे होते. तरीही योना संदेष्ट्याने निनवेला वाचवले म्हणून परमेश्वराविरुद्ध, कटुतेमुळे आपल्या स्वत:च्या संजीवनाचा त्याग केला. हे एक कारण आहे की निनवेमधील संजीवन कुठेही गेले नाही तर ते मरण पावले. आणि आता, शंभर वर्षांनंतर, ते नेहमीपेक्षा वाईट झाले.

लागूकरण:

या उतार्‍यात, नहूमद्वारे प्रभूचे वचन सांगते की “जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांची येशू काळजी घेतो.” दुस-या शब्दात, देवाने यहूदाच्या लोकांना दिलेले अभिवचन होते की येत असलेल्या विनाशातही, “निश्चित विनाशाच्या वेळी मी तुम्हाला राखीन आणि तुमचे संरक्षण करीन.” या समयी तुमचा कोणाचा भरवसा आहे? तुम्ही लोक, ठिकाणे आणि गोष्टींवर विश्वास ठेवला आहे किंवा तुमचा विश्वास प्रभूवर ठेवला आहे? मी हे विचारत आहे कारण दावीद म्हणाला होता, “कोणी रथाची व कोणी घोड्यांची बढाई मारतात; आम्ही तर आमचा देव परमेश्वर ह्याच्या नावाची प्रशंसा करू”  (स्तोत्र 20:7). आज मी तुम्हाला अटळ खात्रीने सांगू शकतो की “जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांची येशू काळजी घेतो!” ह्याचा मी जिवंत पुरावा आहे!

प्रार्थना:

प्रिय येशू,

आज सकाळी, मला तुझ्यावर असलेल्या माझ्या पूर्ण विश्वासाची पुष्टी करायची आहे. माझा विश्वास आणि आज्ञाधारकता यासाठी इतर संभाव्य दावेदार आहेत, परंतु ते सर्व सैतानाकडूनच पाठवले गेले आहेत. देवा, अविश्वासाने मी तुझा अपमान करणार नाही! मी सर्वपणे तुझा आहे! येशुच्या नावात आमेन.