“तुमच्याकडे अजून वेळ आहे!”

"तुमच्याकडे अजून वेळ आहे!"

“तुमच्याकडे अजून वेळ आहे!”

वचन:

यशया 55:6

परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा; तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा.

निरिक्षण:

संदर्भानुसार, हा इस्राएल लोकांना परमेश्वराकडे परत येण्याची हाक होती, जेव्हा जाण्याचा अजून समय होता. दुसऱ्या शब्दांत, देवाचा त्यांच्यासोबतचा संयम संपत चालला होता. उत्पत्ति 6:3 मध्ये पवित्र शास्त्र म्हणते की “माझ्या आत्म्याची त्याच्या ठायी सर्वकाळ सत्ता राहणार नाही. यशया म्हणाला, “तो आत्ता तुमच्या जवळ आहे.” वाट पाहू नका! “तुमच्याकडे अजून वेळ आहे!”

लागूकरण:

देवाच्या लोकांना स्वर्गातून पाठवलेल्या या निर्देशाचा प्रचंड इतिहास आहे. इतर देवतांच्या मागे सतत धावत राहिल्यामुळे इस्राएलास पूर्वीचे वैभव परत मिळाले नाही. पण आज याबद्दल बोलूया. आपण देवाच्या न्यायाबद्दल बोलणार नाही, ज्यावर आपल्यापैकी अनेकांचा विश्वास आहे की ते येत आहे, त्याऐवजी, त्याच्या कृपेबद्दल पुन्हा एकदा बोलू. मुद्दा हा नाही की आपण देवाच्या कृपेला पात्र आहोत कारण आपल्याला माहित आहे की आपण नाही. पण सत्य हे आहे की, तो आत्ता देखील आपल्या जवळ आहे. तो वाट पाहत आहे. तो विनवणी करत आहे. तो विव्हळत आहे. त्याला आपण त्याच्यासोबत हवे आहोत. आपले धावपळीचे दिवस संपले पाहिजेत आणि आपण सर्व परत त्याच्याडे यावे अशी त्याची इच्छा आहे. मी हे तुम्हास लिहित असतानाही तो तुमच्या आणि माझ्या जवळ आहे.  तो प्राप्त होईल तोपर्यंत त्याचा शोध घेऊया. कारण “तुमच्याकडे अजून वेळ आहे!” आणि त्यामध्येच कृपा आहे. तो आम्हाला फसवणार नाही. तो आपल्यापासून लपून राहणार नाही. तो आमच्यावर रागावलेला नाही, पण घड्याळ वाजत आहे समय निघून चालला आहे. परमेश्वराला शोधण्याची वेळ आली आहे, त्याला मिळवून घ्या कारण समय सतत भविष्याकडे सरकत आहे. “तुमच्याकडे अजून वेळ आहे,” तो वाट पाहत आहे.

प्रार्थना:

प्रिय येशू,

मी तुझा आभारी आहे की तू माझी वाट पाहत आहेस. मला खूप आनंद झाला की तू मला कधीही सोडले नाहीस आणि तू मला सोडणार नाहीस, तू माझ्या जवळ राहतो. मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येऊ इच्छित आहे. मी आज आणि दररोज तुझा आहे. माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे माझा वापर कर. येशुच्या नावात आमेन.