“त्याबद्दल रडणे थांबवा आणि त्याबद्दल काहीतरी करायला सुरुवात करा!”

"त्याबद्दल रडणे थांबवा आणि त्याबद्दल काहीतरी करायला सुरुवात करा!"

“त्याबद्दल रडणे थांबवा आणि त्याबद्दल काहीतरी करायला सुरुवात करा!”

वचन:

2 शमुवेल 13:39

अबशालोमाला भेटायला दावीद राजा फार आतुर झाला; कारण अम्नोन मरून बरेच दिवस झाल्यामुळे त्याचे चित्त शांत झाले होते.

निरीक्षण:

अबशालोमाने आपला सावत्र भाऊ अम्नोन यास त्याची (अबशालोम) बहीण तामार, जी अम्नोनची सावत्र बहीण होती, तिच्यावर बलात्कार केल्याबद्दल त्याचा खून केला. दाविद राजाने अम्नोनास शिक्षा होईल असे कधीही काहीही केले नाही आणि म्हणून दीर्घ कालावधीनंतर अबशालोमाने आपल्या भावाला ठार मारले. यामुळे दाविदाला आपला बलात्कारी मुलगा अम्नोन मरण पावल्याबद्दल रडू कोसळले. अबशालोम आपल्या आईकडील आजोबांसोबत राहण्यासाठी दुसऱ्या शहरात पळून गेला. येथे बायबल म्हणते की दाविदाला जाऊन अबशालोमास भेटण्याची इच्छा होती कारण त्याचे अम्नोनाचा मृत्यबद्दल शोक करणे संपले होते.परंतू तो गेला नाही. त्याच्या सध्याच्या संकटाबद्दल असे मत आहे की आता, “त्याबद्दल रडणे थांबवा आणि त्याबद्दल काहीतरी करायला सुरुवात करा!”

लागूकरण:

ही कथा बायबलमधील सर्व विचित्र कथांपैकी एक आहे. गाथेचा हा भाग घडल्यानंतर, दाविदाचा सर्वोच्च सेनापती, यवाब याने राजाकडे संदेष्टा म्हणून काम करण्यासाठी एका स्त्रीला वेशात पाठवले जेणेकरून तो त्याने त्याचा मुलगा अबशालोम यास यरुशलेमेस परत आणावे. या सगळ्यांमागे यवाब आहे हे दाविदाला समजले आणि त्याने अबशालोमास बोलवून घेतले. जेव्हा अबशालोम घरी परतला, तेव्हा त्याला त्याच्या वडिलांना भेटायचे होते आणि सर्व काही समजावून सांगायचे होते, परंतु दाविदाने त्याला भेटण्यास नकार दिला. तो तरुण इतका चिडला की त्याने आपल्या वडिलांच्या राज्याचे तुकडे केले आणि यवाबाने त्याला ठार मारले. दाविदाने काय केले? पुन्हा एकदा तो याबद्दल रडू लागला. राजा दाविदाने त्याच्या घरात राजा होण्याचे थांबवले असते आणि त्याऐवजी वडील म्हणून कार्य केले असते तर हे सर्व टाळता आले असते. आज तुम्ही ज्या गोंधळात आहात त्याबद्दल तुम्ही रडत असाल तर, “त्याबद्दल रडणे थांबवा आणि त्याबद्दल काहीतरी करा!”

प्रार्थना:

प्रिय येशू,

माझ्या जीवनात मला प्रत्येक गोष्टींसाठी रडण्यास व त्याबद्दल दु:ख करून घेण्यास मला थांबव. जी आवाहने येतात त्यांना निर्भीडपणे सामोरे जाण्यास व त्या परिस्थिती स्थिर राहण्यास मला सहाय्य कर जी बुध्दी तु दिली आहेस तिचा वापर करून सर्व परिस्थितीला योग्य रीतीने हाताळण्यास मला आज सहाय्य कर. माझा विश्वास आहे तू माझ्या बरोबर आहेस. येशुच्या नावात आमेन.