वचन:
नीतिसुत्रे 3:3
दया व सत्य ही तुला न सोडोत; त्यांची माळ तू आपल्या गळ्यात वागव; त्यांना आपल्या हृत्पटलावर लिहून ठेव;
निरीक्षण:
हे सुज्ञ शलमोनाची वचने आहेत, ज्याने हे स्पष्ट केले की आपण सर्वांनी दया व सत्य याचा स्वीकार केला पाहिजे. तो म्हणाला की हे दोन गुण किती महत्त्वाचे आहेत याची आठवण करून देण्यासाठी आपल्याला जे काही करावे लागेल ते आपण केले पाहिजे. यात आपल्या गळ्यात वचने वागवणे आणि ते आपल्या हृदयात अंतर्भूत करणे यांचा समावेश होता. शलमोनासाठी, यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली “दया व सत्य याचे सामर्थ्य” याच्या संबंधित होती.
लागूकरण:
हे वचन वाचायला खुप सोपे आहे, परंतू आचरणात आणायला अवघड आहे. तुम्ही विचारू शकता, “का?” सोप्या भाषेत सांगायचे तर, दया आणि सत्य आपल्या खालच्या (पापी) स्वभावाच्या विरुद्ध आहे. जेव्हा आपल्या जीवनात दया आणि सत्य हे नेहमी प्रबळ असायला पाहीजे, तेव्हा त्वरीत स्वार्थ आणि भीती दारात लपून बसते. जे म्हणायचे आहे त्याचा या वस्तुस्थितीशी संबंध आहे, “यात माझ्यासाठी काय आहे?” याविषयी आपण सावधगिरी बाळगली नाही तर, हे अगोदरपासून म्हणण्यात येणारे वाक्य आपल्यावर राज्य करु शकते. परंतु हा जगाचा मार्ग आहे, ख्रिस्ताच्या अनुयायांचा मार्ग नाही. आपला पहिला विचार नेहमी दयेचा असायला हवा आणि आपण ज्यास दया म्हणतो त्याच्याशी आपला प्रतिसाद नेहमी सत्यतेचा असायला हवा. अरे पण थांबा. त्यात तुमच्या आणि माझ्यासाठी काहीतरी आहे. पुढच्याच वचनात असे म्हटले आहे, आपण पृथ्वीवर जीवन जगत असताना दया व सत्य यामध्ये राहीलो, म्हणजे तुला देव व मनुष्य ह्यांच्याकडून अनुग्रह व सुकीर्ती ही प्राप्त होतील. जेव्हा आपण दया व सत्य या आधारित जीवन जगतो, तेव्हा आणि तेव्हाच आपल्याला “दया व सत्य याचे सामर्थ्य” अनुभवता येते.
प्रार्थना:
प्रिय येशू,
तुझे आभार की माझे तुझ्यावर आधारीत असलेले जीवन हे दया व सत्य यावर आधारीत आहे. प्रभू मला अधिक दयेने वागण्यास व सत्यतेने चालण्यास मदत कर आणि तुझ्या वचनास आपल्या गळ्यात वागवण्यास व आपल्या ह्रदयात लिहून ठेवण्यास मदत कर. तुझ्यामध्ये वाढत असताना त्या दयेच्या व सत्यतेच्या सामर्थ्याचा अनुभव घेण्यास मदत कर. येशुच्या नावात आमेन.