देव कोण आहे?

देव कोण आहे?

देव म्हणाला, “आपण आपल्या प्रतिरूपात, आपल्या प्रतिरूपात मानवजातीला निर्माण करूया, जेणेकरून ते समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी… आणि जमिनीवर संचार करणाऱ्या सर्व प्राण्यांवर राज्य करतील.”

देव कोण आहे हे आपल्याला माहीत नाही, तरी पण आपण अपुर्ण आहोत, कारण विश्वास तर प्रत्येक व्यक्ती करतात, जे मुर्ती पुजा करीतात ते देखील विश्वास करतात, पण आपण ज्या देवाची उपासना करतो तो देव आहे की नाही हेच आपल्याला माहीत नाही तरी पण आपण अंध विश्वास करीतो.

जेव्हा देव आपल्या प्रत्येक इच्छा पुर्ण करीतो तर आपल्याला देखील पुर्ण व्हावे लागेल, एकदा मी मडंळी मध्ये आराधना करत होतो, तेव्हा एक आंटी प्रार्थना करत म्हणत होती की देवाने आपल्याला प्रतिरुपाचे बनवले आहे.

नतंर मी खुप विचार केला आणि प्रर्थना केली आणी वचन वाचण्यास बसलो, तेव्हा देव वचनातुन बोलला की देव आत्मा आहे, त्याची उपासना आत्म्याने व खरे पणाने करावी हे वाचल्या नतंर मी आनंदी झालो.

पित्या, आम्हाला तुमची उपासना आत्म्याने व खरे पणाने करण्यास सहाय्य आणि मदत करा, येशुच्या नावात आमेन