“देवाकडून आमच्याकडे”

"देवाकडून आमच्याकडे"

“देवाकडून आमच्याकडे”

वचन:

स्तोत्र 127:3

पाहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे; पोटचे फळ त्याची देणगी आहे.

निरीक्षण:

येथे स्तोत्रकर्त्याने लिहिले की मुले ही पृथ्वीवरील लोकांसाठी परमेश्वराची देणगी आहेत. एखादी व्यक्ती येशूचे अनुसरण करते किंवा नाही, तरीही प्रभु त्यांना आशीर्वाद देतो. श्रीमंत, किंवा गरीब, किंवा मध्यम वर्गीय लोक असो देव त्यांना मुले देऊन आशीर्वाद देतो.  कधीकधी एक मूल त्याच्या किंवा तिच्या कुटुंबातील अनेक पिढ्यांना गरिबीतून बाहेर काढू शकते. असे अनेक फायदे आहेत जे मुले आपल्या आयुष्यात आणतात. खरोखर ही “देवाकडून आमच्याकडे” येणारी उत्तम देणगी आहे,

लागूकरण:

जर तुम्ही पालक आहात, तर देवाने तुम्हाला दिलेली सर्वात मोठी भेट कोणती आहे? चांगले पालक, अद्भूत शिक्षण, प्रतिभा, क्षमता, पैसा, घर, स्वातंत्र्य अशी उत्तरे देणारे अनेक लोक असतील. तरीही, एक पालक म्हणेल, “देवाने, मला दिलेलं मुल.” अरे, मला माहित आहे की काही पालक खुप बिकट परिस्थितीतून जातात, आणि आपल्या मुलांसह परत येतात. तरीही मी आणि माझी पत्नी कधीकधी संकटात असताना, आम्ही देवाचे सर्वात मोठे धडे शिकलो आहोत. आपल्या लेकरांना त्रासातून जात असताना आपल्याला खुप दु:ख होते. आजार असो, शैक्षणिक समस्या असतील, व इतर प्रकारचे संकट. परंतू आपण हे लक्षात ठेवाव की मुलं ही देवाने दिलेली देणगी आहे देव त्यांची नक्कीच काळजी घेतो आणि आपल्यालाही त्यांना सांभाळण्यास सामर्थ्य देतो. त्यांना प्रभूमध्ये वाढविण्यास आपण नेहमी तत्पर असले पाहीजे कारण ती “देवाकडून आपल्याकडे आलेली देणगी आहे”

प्रार्थना:

प्रिय येशू,

माझ्या आणि माझ्या लेकरांबद्दल मी तुला धन्यवाद देतो. तू आम्हाला संभाळत आला आहेस, प्रभू तू दिलेले मुलं आम्हाला मिळालेली सर्वात मोठी भेट आहे. त्यांना तुझ्या वचनात व तुझ्या सानिध्यात वाढविण्यास आम्हाला सहाय्य कर, धन्यवाद, येशूच्या नावात आमेन.