वचन:
कलस्सै 1:10
अशा हेतूने की, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषवण्याकरता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पुर्ण ज्ञानाने तुमची वृध्दी व्हावी.
निरीक्षण:
हे काही वचन होते जे प्रेषित पौलाने तुर्की राष्ट्रात वसलेल्या कलस्सै येथील तरुण मंडळीला लिहिले होते. तो त्यांना म्हणतो की जेव्हापासून त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांच्याबद्दल ऐकले आहे, तेव्हापासून ते प्रार्थना करत आहेत की त्यांनी देवाच्या इच्छेच्या ज्ञानाने भरले जावे जेणेकरून ते परमेश्वराला योग्य असे जीवन जगू शकतील आणि प्रत्येक गोष्टीत त्याला संतुष्ट करू शकतील. त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीत त्यांना फळ मिळावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी सतत “देवाच्या ज्ञानात वाढ” करणारे लोक व्हावे अशी त्याची इच्छा होती.
लागूकरण:
आज तुम्ही तुमचा वेळ कशात घालवता? अरे, मला माहित आहे की आपण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा किमान स्वतःची तरतूद करण्यासाठी काम करतो. आणि अर्थातच, मला माहित आहे की आम्ही ज्या लोकांसाठी काम करतो त्यांना खूश ठेवणे आवश्यक आहे. आणि हो, तुमचे कुटुंब असेल तर तेथेही तुमच्या असंख्य जबाबदाऱ्या असतील. उद्या पुन्हा हे सर्व कार्य करण्यास, सर्वांना विश्रांती घेण्यासाठी आणि स्वत:ला रीबूट करण्यासाठी वेळ हवा असतो, परंतु मी तुम्हाला हे विचारतो. तुम्ही “देवाच्या ज्ञानात वाढत आहात का?”. आज जसा वेळ देत आहात त्याप्रमाणे तुमच्या दिवसात अशी जागा आहे का?, जी तुम्ही विशेषतः बाजूला ठेवली आहे जेणेकरून तुम्ही खरोखरच, “देवाच्या ज्ञानात वाढत राहावे”. जर येशू तुमच्यामध्ये वाढत नसेल, तर तुम्ही खरोखरच वाढत नाही, हे सत्य आहे. खरं तर, तुम्ही मृत पावत आहात. मला माहित आहे, की तुम्हाला आधीच माहित आहे, म्हणून आता ते सर्व बदलले पाहिजे. म्हणून “देवाच्या ज्ञानात वाढण्यास” आजच का सुरू करू नये.
प्रार्थना:
प्रिय येशू,
आज पुन्हा एकदा, मला तुझ्याबरोबर वेळ घालविण्यास मदत कर, जेणेकरून मी तुझ्या ज्ञानात वाढू शकेल! प्रभू तुझ्या सोबत संगती करणे किती चांगले आहे. तुला माझा उत्तम वेळ देण्यास मला सहाय्य कर. येशूच्या नावात आमेन.