वचन:
2 करिंथ 5:17
म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे.
निरीक्षण:
या अध्यायात, प्रेषित पौल, ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांच्या विजयाचे वर्णन करतो. तो म्हणतो, “जर कोणी पुरुष किंवा स्त्री ख्रिस्तामध्ये असेल, तर ती नवीन निर्मिती आहेत. नंतर तो म्हणतो, “जुने ते होऊन गेले, पाहा ते नवे झाले आहे!”
लागूकरण:
आपण नेहमी नविन गोष्टींचे कौतूक करणे कधीही सोडत नाही! जुन्या घरावर नवीन रंगकाम असो, किंवा नवीन कार, किंवा नवीन सूट, किंवा नवीन केसरचना, किंवा नविन ठिकाण असो आपल्याला नेहमीच नविन गोष्टी आवडत असतात. परंतु येथे, महान प्रेषित आपल्याला आठवण करून देतो की ख्रिस्त येशूमध्ये असलेल्या संपुर्ण नवीन जीवनाप्रमाणे आश्चर्यकारक कोणतीही गोष्ट नाही. ते बरोबर आहे! पौलाला धर्म माहीत होता आणि धर्माने तो अपयशी आणि निराश झाला. जेव्हा त्याने ख्रिस्ताला आपला प्रभु आणि तारणारा म्हणून स्वीकारले तेव्हा तो एक नवीन निर्मिती झाला. त्याला येशूमध्ये नविन जीवन मिळाले. त्याने येशूबद्दल गीत गायले. त्याने येशूबद्दल उपदेश केला. त्याने येशूबद्दल शिक्षण दिले. त्याने येशूसाठी चमत्कार केले. त्याने येशूसाठी मरण पत्करले. प्रेषित पौलाच्या आयुष्याचा संपूर्ण उत्तरार्ध “नवीन येथे आहे” यात गेला. जो येशुला स्विकारतो तो कधीही जुना, रिकामा, आणि व्यर्थ असणार नाही तो एक नवी उत्पत्ती होतो आणि प्रभूमध्ये फळ देतो, म्हणून पुन्हा सांगू द्या, “नवीन येथे आहे!”
प्रार्थना:
प्रिय येशू,
सर्व काही नवीन करण्यासाठी या जुन्या पृथ्वीवर आल्याबद्दल तुझे आभार. मी खूप आभारी आहे की मला उद्देशाच्या अभावाने कंटाळवाणे जीवन जगावे लागत नाही. तुझ्यामुळे, येशू, मला दररोज, नवीन जीवन मिळते! हे नविन जीवन जगत असताना तुझा गौरव होऊ दे आणि इतरांना या नविन जीवनाचा आनंद मिळावा म्हणून सुवार्तेसाठी माझे मार्ग मोकळे कर. येशूच्या नावात आमेन.