वचन:
नहेम्या 4:14ब
“त्यांची भीती धरू नका; थोर व भयावह जो परमेश्वर त्याचे स्मरण करून तुमचे भाऊबंद, तुमचे कन्यापुत्र, तुमच्या स्त्रिया व तुमची घरे ह्यांच्यासाठी युद्ध करा.”
निरीक्षण:
यरुशलेमच्या भिंतींची पुर्नबांधनीचे काम करणाऱ्या लोकांना नहेम्याचे हे वचन होते. ते भिंत पुन्हा बांधत होते आणि कोणत्याही क्षणी लढण्यास तयार होते, परंतु जेव्हा शेजारच्या राष्ट्रांनी ते काय करत आहेत हे ऐकले तेव्हा त्यांच्या विरोधात एकत्र येऊन त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा ते कट करत होते. सनबल्लट आणि तोबिया या दोन विरोधींच्या नेतृत्वाखालील स्थानिक लोकांच्या हस्तक्षेपामुळे ते आधीच तणावात होते. जेव्हा त्यांचे धैर्य कमी होऊ लागले, तेव्हा नहेम्या आत आला आणि म्हणाला, “परमेश्वराचे स्मरण करा,” तो आमच्याबरोबर आहे.
लागूकरण:
जेव्हा मी संकटात असतो, आणि नवीन प्रदेश जिंकण्याऐवजी मी जमीन गमावत आहे असे दिसते, तेव्हा मी नेहमी थांबतो आणि स्वतःला हा प्रश्न विचारतो. “परमेश्वर माझ्याबरोबर आहे का?” हा एक महत्त्वाचा प्रश्न का आहे याचे कारण म्हणजे एकतर हे असे काहीतरी आहे जे तुम्हाला एकट्याने पूर्ण करायचे आहे किंवा हे असे काहीतरी आहे जे प्रभुने तुम्हाला करायला सांगितले आहे! असे काही वेळा घडले आहे की मी खूप निराश झालो आहे आणि मला खूप पराभूत झाल्यासारखे वाटले आहे, परंतु नंतर मला माझ्या आत हा आवाज ऐकू येतो, “परमेश्वराचे स्मरण कर,” तुला ते करण्यास सांगितले आहे! तेव्हाच मी माझ्या आत्म्याने आणि शरीराने पुढे जाण्यासाठी बळकट होतो. जेव्हा नहेम्याने या लोकांना सांगितले, “परमेश्वराचे स्मरण करा,” तेव्हा त्यांना लगेच प्रोत्साहन मिळाले आणि ते काय करत होते हे त्यांना कोणी सांगितले होते हे लक्षात ठेवून त्यांनी अशक्य कार्य पुर्ण केले. जेव्हा तुम्हाला कळते की तुम्ही दैवी नियुक्तीखाली आहात आणि हे कार्य अशक्य वाटते, तेव्हा “प्रभूचे स्मरण करा!”
प्रार्थना:
प्रिय येशू,
या समयी, तुझ्या वचनातील हा परिचित उतारा वाचून मला आधीच प्रोत्साहन मिळत आहे. आज मला पुन्हा मदत कर. तू माझ्यासोबत आहे हे लक्षात ठेवण्यासाठी मी प्रार्थना करत आहे, मला नेहमी सहाय्य कर. येशुच्या नावात आमेन.