“मी फक्त हेच सांगणार आहे”

“मी फक्त हेच सांगणार आहे"

“मी फक्त हेच सांगणार आहे”

वचन:

योहान 14:6
येशूने म्हटले मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.

निरीक्षण:

हे येशूचे वचन आहेत आणि जर तुम्ही येशूचे अनुयायी असाल तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. मी जोर देऊन सांगू शकतो की जेव्हा तो हे वचन बोलला तेव्हा लोकांना ते आवडले नसेल आणि आज जेव्हा ख्रिस्ती लोक हे वचन बोलतात तेव्हा त्यांना ते नक्कीच आवडत नाही.  आज बर्‍याच ख्रिस्ती लोकांना त्यांना काय म्हणायचे आहे याचा पाठपुरावा घेण्यासाठी पुरेशी बायबलची शिकवण नाही आणि बरेच जन असे आहेत त्यांना ते इतरांना सांगण्याची भीती वाटते. कदाचित सोशल मीडियाच्या या दिवसांमध्ये आपण जगत आहोत यामुळे तसे असावे, लोकांना खात्री नसते की ते कोणाला बोलत आहेत, म्हणून ते काहीही बोलत नाहीत. तर, “मी फक्त ते सांगणार आहे.” येशू हा पित्याकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे.

लागूकरण:

“ख्रिस्ताचे अनुयायी” हेच वर्षानुवर्षे विश्वास ठेवतात आणि म्हणतात. पण, आता आपण अशा काळात जगत आहोत जिथे लोकांना कोणाचाही अपमान करायचा नाही. म्हणून, ते सुरुवातीच्या मंडळीचे हे मूलभूत सिद्धांत लपवितात. परंतु आपण या समस्येला कितीही दूर करू इच्छित असलो किंवा काहीही बोलत नसलो तरी, “मी फक्त ते सांगणार आहे,” की देवाकडे जाण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे त्याचा पुत्र,प्रभू येशू ख्रिस्त. नवीन करारात प्रेषितांचा असाच विश्वास होता. वर्षानुवर्षे प्रत्येक ख्रिस्ती लोकांनी जे मरण पावले यावर विश्वास ठेवला. तुम्हाला हवे असल्यास प्रतिसाद द्या, किंवा तुम्हाला हवे असल्यास माझा तिरस्कार करा, किंवा तुम्हाला हवे असल्यास मला रद्द करा, किंवा तुम्हाला हवे असल्यास माझ्याबद्दल वाईट गोष्टी पसरवा, परंतु “मी फक्त हेच सांगणार आहे” की येशू ख्रिस्तच हा मार्ग सत्य आणि जीवन आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय स्वर्गातील पित्याकडे जाण्याचा पृथ्वीवर कोणताही मार्ग नाही.

प्रार्थना:

प्रिय येशू,

आज, मी तुमला माझा प्रभु आणि तारणहार म्हणून स्वीकार करण्यास सक्षम आहे याबद्दल मी खूप आभारी आहे. मी पण पुन्हा सांगणार आहे. तुझ्या पवित्र नावाशिवाय स्वर्गातील पित्याकडे जाण्याचा कोणताही मार्ग नाही. म्हणूनच आज पुन्हा एकदा, मी प्रार्थना करत आहे आणि माझ्या प्रभु म्हणून तुझी घोषणा  करत आहे. येशुच्या नावात आमेन.