वचन:
स्तोत्र 71:18
भावी पिढीला तुझे बाहुबल विदित करीपर्यंत पुढच्या पिढीतील सर्वांना तुझ्या पराक्रमाचे वर्णन करीपर्यंत, मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी, हे देवा, मला सोडू नकोस.
निरीक्षण:
दाविद राजाने हे विधान सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी केले होते. तो म्हणाला, “मी वयोवृध्द झालो तरी,” मी हा जीवनाचा आणि आशेचा हा संदेश येणाऱ्या पिढीला आणि त्यानंतरच्या पिढीला देखील सांगण्यास कधीही थांबू नये म्हणून सहाय्य कर. देव प्रीती आहे, आणि देव तुमच्यावर प्रेम करतो हा संदेश प्रत्येकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याच्या हृदयाचा हा आक्रोश होता!
लागूकरण:
हा उतारा किती सुंदर आहे. आपण एक तरुण म्हणून हा विचार करत नाही की आपण कधीतरी म्हातारे होऊ. खरोखर, आज आपल्याला असे वाटत असेल की आपण म्हातारे झालो तरी आपल्याजवळ जी तारणाऱ्याबद्दलची उत्कंठा आणि आवेश आहे तो कधीही हरपू नये. आपण जगत असताना अशी वेळ येऊ नये की आपण येशूला जगाची एकमेव आशा म्हणण्याचे व विश्वास ठेवण्याचे थांबवावे. येशू नेहमीच आपला संदेश असावा आणि तो संदेश लोकांपर्यंत पोहचविण्याचा आवेश आपल्यात नेहमीच असावा. आपण दाविद राजाला या उताऱ्यात असे म्हणतात ऐकतो. अर्थात, तो कधीही येशूला भेटला नव्हता किंवा त्याच्याबद्दल त्याने ऐकले नव्हते, तरीही तो मशीहाबद्दल खूप आकांक्षा बाळगत होता. म्हणूनच त्याने आम्हाला या परिच्छेदात सांगितले की मी पुढच्या पिढीला आणि ज्यांना देवाच्या प्रेमाचा संदेश देणे बाकी आहे त्यांना सांगणे कधीही थांबविणार नाही. “मी वयोवृध्द झालो तरीही!”
प्रार्थना:
प्रिय येशू,
मला तुझा संदेश इतरांपर्यंत पोहचविण्यास सहाय्य कर. जशी तुझी आज्ञा आहे की संपुर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करावी, त्याप्रमाणे मला करण्यास सहाय्य कर आणि माझा उपयोग तुझ्या कार्यासाठी करून घे “मी वयोवृद्ध झालो तरीही”. तू माझ्या बरोबर आहेस म्हणून तुला धन्यवाद. येशुच्या नावात आमेन.