वचन:
स्तोत्र 32:7
तू माझे आश्रयस्थान आहेस. तू संकटापासून माझे रक्षण करशील; मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढशील.
निरीक्षण:
इस्राएलाचा परमेश्वर देव याच्याविषयी राजा दाविदाची ही घोषणा होती. त्याने परमेश्वराला प्रार्थना केली आणि म्हणाला, तू माझे आश्रयस्थान आहेस. देव नेहमी शत्रूच्या धोक्यांपासून त्याचे रक्षण करेल या वस्तुस्थितीबद्दल देखील तो बोलला. शेवटी दाविद म्हणाला, “मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढशील.” आपला प्रिय राजा दाविद याच्या शब्दांनी किती सुंदर चित्र रेखाटले आहे.
लागूकरण:
हे वचन बायबलमधील प्रिय वचनांपैकी एक आहे. या उतार्याबद्दल गाणी लिहिली गेली आहेत, तसेच त्याच शीर्षकाने चित्रपट देखील बनविला आहे. आपण आपल्या जीवनात संकटांपासून लपण्यासाठी अनेक ठिकाणी पळतो. आपण आपले सहाय्य या जगातील लोकांकडे शोधतो. आपण एखाद्या त्रासात असलो की आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीला आपल्या सर्व गरजा, समस्या सांगतो, पण प्रत्येक वेळा आपल्याला निराशा येते मनुष्य आपल्याला पाहीजे तसा मदत करू शकत नाही. जेव्हा आपण येशू जवळ येतो, तेव्हा नेहमीच तो आपले सहाय्य करण्यास तयार असतो. जेव्हा आपण त्याला आपला तारणारा म्हणून स्विकारतो तेव्हा त्या आश्रयस्थानाचा शोध घेण्याचे आपण थांबवतो कारण, “येशू माझे आश्रयस्थान आहे”. का? कारण येशूमध्ये आपल्याला सर्व संकटांपासून लपण्याची जागा मिळते. येशूचा स्विकार केल्यामुळे आपल्यावर सतत हल्ला होत असतो, जो आपल्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असतो. तथापि, तो आपल्याला नेहमी त्यापासून वाचवितो. शेवटी, आपल्याला त्याने अडचणीच्या काळात गाण्यास मुक्ततेची गीत देखील दिले आहे. आपल्या संकटाच्या समयात आपण नेहमी मुक्ततेची स्तोत्रे गावी. तुम्ही कशाचीही चिंता करू नका कारण “येशू माझे आश्रयस्थान आहे!”
प्रार्थना:
प्रिय येशू:
“तू माझे आश्रयस्थान आहेस” म्हणून मी कोणत्याही संकटाला भिणार नाही. प्रभू मला तुझ्यावर विश्वास ठेऊन तुला माझा आश्रयस्थान करण्यास सहाय्य कर. आज मी माझे समर्पण तुला करत आहे. येशूच्या नावात आमेन.