वचन:
नीतिसुत्रे 27:23
तू आपल्या शेरडामेंढरांची स्थिती पाहत जा; आपल्या कळपांवर चांगली नजर ठेव;
निरीक्षण:
सर्व “शेतकरी आणि मेंढपाळ” यांच्यासाठी हे एक सुज्ञ वचन आहे. सुज्ञ पुरुष येथे सांगतो की मेंढपाळाने आपल्या कळपांच्या स्थितीची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. गवत आणि कुरण याबद्दल देखील येथे चर्चा आहे, जिथून शेतकरी येतो. हे सर्व एकत्र कार्य करते. जेव्हा शेताची काळजी घेतली जाते तेव्हा कळपाला निरोगी आहार मिळतो आणि त्या बदल्यात, शेळ्यांचे दूध, अन्न आणि लोकरीचे वस्त्र आपल्या मानव जातीसाठी तयार होते व आपल्यास मिळते. परंतु “शेतकरी आणि मेंढपाळांनी” त्यांच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केल्यास यापैकी काहीही राहत नाही.
लागूकरण:
एक प्रभूचा सेवक म्हणून आपणही शेतकरी आणि मेंढपाळ आहोत. सोप्या शब्दांत, “जोपर्यंत आपण आपल्या बागेची आणि आपल्या मेंढरांची काळजी घेतो तोपर्यंत सर्व काही ठीक असते, पण जर आपण ते दुसर्यावर सोडून निघून जातो किंवा आपली बाग आणि आपल्या मेंढरांची काळजी घेण्याचा कंटाळा करतो तेव्हा आपले सर्व एका रात्रित नाहीतसे होते.” का? कारण पुढच्या वचनात असे सांगतिले आहे की संपत्ती सदा टिकत नाही; राजमुकुट पिठ्यानपिठ्या टिकेल काय? मला खात्री नाही की तुम्ही मेंढपाळ किंवा शेतकरी किंवा पाळक किंवा व्यवसायिक आहात. पण तुमचा कळप आणि तुमच्या बागा दुसऱ्या कोणीकडे त्याची काळजी घ्यावी म्हणून सोडून देऊ नका. थोड्याच वेळात काळजी घेण्यासारखे बरेच काही शिल्लक राहणार नाही.
प्रार्थना:
प्रिय येशू,
तू माझी काळजी सतत घेतोस म्हणून तुझे आभार. माझे पालनपोषण केल्याबद्दल, मला खायला दिल्याबद्दल, मला आरोग्य दिल्याबद्दल धन्यवाद, परंतु सर्वात महत्वाचे, मला तारण दिल्याबद्दल तुझे आभार धन्यवाद. प्रभू एक शेतकरी व मेंढपाळ म्हणून तू मला दिलेल्या तुझ्या सेवेमध्ये, मेंढरांची काळजी घेण्यास मला सहाय्य कर. त्यांची काळजी घेऊन त्यांच्या गरजा ओळखण्यास मला ज्ञान दे. जेणेकरून तुझा कळप भरभराट होऊन उन्नत पावेल. येशुच्या नावात आमेन.