वचन:
लूक 12:31
तर तुम्ही त्याचे राज्य मिळवण्यास झटा, म्हणजे त्याबरोबर ह्याही गोष्टी तुम्हांला मिळतील.
निरीक्षण:
आपल्या शिष्यांशी बोलताना येशूने आपल्या अनुयायांना “सर्वाधिक महत्त्वाच्या गोष्टीत राहा” असा सल्ला दिला. अर्थात, येशू देवाच्या राज्याविषयी आणि ते आपण आपल्या पुर्ण अंतःकरणाने त्यास मिळविण्यास झटावे याबद्दल बोलत होता. तो वचन देतो की आपल्या जीवनातील प्रत्येक आवश्यक गरजांची तो काळजी घेईल, परंतु त्याची आज्ञा ही आहे की, सर्वप्रथम, आपण देवाच्या राज्याचा शोध घ्यावा.
लागूकरण:
मला माहित आहे की जेव्हा लोक मला विचारतात, “तुझ्या जीवनात सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे” मी लगेच विचार करत नाही की “देवाचे राज्य!” सहसा, मला असे वाटते की माझे कुटुंब, किंवा माझी बिले भरणे, किंवा चर्चचे नेतृत्व करणे ज्याचा मी पास्टर आहे, किंवा माझ्या वृद्ध आईची काळजी घेणे, किंवा मी गेल्यावर माझा मुलाची काळजी कोण घेईल ही माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु, येशू म्हणाला, “जर तुम्ही देवाच्या राज्याचा शोध घेत “सर्वात जास्त महत्त्वाचे” काय याला बिलगूल राहाल, तर या इतर सर्व गोष्टींची काळजी घेतली जाईल!” आता ते माझे वाक्य आहे, परंतु येशूने असेच सांगितले आहे. मला, एक सुवार्तेच्या सेवकाला, येशूचे हे साधे तत्त्व लक्षात ठेवणे इतके कठीण का आहे? मला असे वाटते कारण आपण अनेकदा येशूचे साधे शब्द पाहतो आणि म्हणतो, “ते खूप सोपे आहे.” पण येशूने सांगितलेली प्रत्येक गोष्ट सोपी आहे; परंतू तसे करणे फक्त कठीण आहे! जेव्हा तुम्ही आणि मी दिवसाच्या प्रत्येक मिनिटाला “सर्वाधिक महत्त्वाच्या गोष्टींसह राहू” तेव्हा, आपल्या जीवनातील इतर सर्व गोष्टींची काळजी येशूद्वारे घेतली जाईल! हे करणे कठीण असू शकते, परंतु त्याचा मोबदला आश्चर्यकारक आहे.
प्रार्थना:
प्रिय येशू,
या समयी, मी तुला मुख्य गोष्ट, जपून ठेवण्यास मला मदत कर! मला माहित आहे की जर मी “जे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे त्याबरोबर राहिलो,” तर तू उर्वरीत सर्व गोष्टींची काळजी घेशील. प्रभू सर्वात प्रथम तुझे राज्य मिळविण्यास झटण्यासाठी आमचे सहाय्य कर व तुझ्यावर लक्ष केद्रिंत करण्यास मदत कर. येशुच्या नावात आमेन.