निराश?

निराश?

“तेव्हा परूशी व शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले की, “हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो.”

काल आपण देवाच्या राज्यात ‘गुणवत्तेवर आधारित प्रणाली’ (merit system) नसल्याच्या, आश्चर्यकारक वास्तवावर विचार केला. या गोष्टीमुळे तुम्हाला कधी अस्वस्थ वाटले आहे का?

येशूच्या काळात काही लोकांना, ‘अपयशी’ मानल्या जाणाऱ्या व्यक्तींबद्दल आणि समाजातून बहिष्कृत केलेल्या लोकांबद्दल असलेले त्याचे प्रेम एक समस्या वाटत असे. बहुतेक धार्मिक नेत्यांचा तर या गोष्टीमुळे त्याच्यावर राग होता. देवाच्या सेवेसाठी त्यांनी आपला सर्व वेळ आणि ऊर्जा ‘योग्य गोष्टी’ करण्यावर आणि स्वतःला पापापासून दूर ठेवण्यावर खर्च केली होती. मग, या सर्व प्रयत्नांचे काहीतरी मूल्य असायला नको का? हे न्याय्य वाटत नाही का?

स्वतः एक दीर्घकाळ पास्टर म्हणून काम केलेली व्यक्ती असल्याने, मला हा विचारप्रवाह समजतो. कदाचित असे म्हणणे योग्य ठरणार नाही, तरीही सांगतो, मी माझ्या आयुष्यात देवासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा कठोर प्रयत्न केला आहे. मग, या गोष्टींचे काहीतरी मोल असायला हवे, असे वाटणे स्वाभाविक नाही का?

कदाचित तुम्हालाही हे समजते असेल. तुम्ही हे भक्तिपर वाचन करत आहात, याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातही देवाची सेवा करण्याचा काही इतिहास असावा. कदाचित तुम्हीही देवाच्या कार्यात तुमचा वेळ आणि आपली कौशल्ये दिली असतील. तुम्ही उपासनेत सहभाग घेतला असेल. तुम्ही अशा मोहांना दूर ठेवले असेल जे खरं तर तुम्हाला अनुभवायचे होते, पण तुम्ही स्वतःला रोखून धरले. जर देव न्याय्य असेल, तर या सर्व गोष्टींसाठी स्वर्गात काहीतरी मान्यता मिळायला हवी, असे वाटणे साहजिकच आहे, नाही का?

पण सुदैवाने, देव ‘न्याय्य’ नाही. अजिबात नाही! देव आपल्या पात्रतेपेक्षा कितीतरी अधिक कृपाळू आहे. आणि जिथे गुणवत्तेवर आधारित प्रणाली नसते, तिथे एक अधिक उत्तम गोष्ट मिळते: कृतज्ञता.

याबद्दल आपण उद्या अधिक जाणून घेऊया.

हे प्रभू, आम्हाला आठवण करून दे की तुझे मार्ग आमच्या मार्गांपेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहेत. आमच्या अपेक्षा सोडून देऊन, तुझ्या उदार आणि विनामूल्य कृपेच्या आश्चर्याचा स्वीकार करायला आम्हाला मदत कर. आमेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *