
म्हणून, जो कोणी माझे हे शब्द ऐकतो आणि त्यांनुसार वागतो [त्यांचे पालन करतो], तो खडकावर आपले घर बांधणाऱ्या एका समंजस (विवेकी, व्यावहारिक, शहाण्या) माणसासारखा असेल.
संतुलन बिघडल्यामुळे सैतानाला लोकांचे सुखी जीवन हिरावून घेण्याची संधी मिळते.
सैतान लोकांना अतिरेकी आणि टोकाच्या गोष्टींकडे वळवण्याचा मोह घालतो, तर काहींना आळशी बनवतो; पण प्रार्थना आणि काम हे महत्व पुर्ण आहे, म्हणजे जीवण जगण्यासाठी जी गोष्ट उपयोगी आहे, पण सैतान असे करतो की. तो काहींना देवापेक्षा संपत्तीला अधिक महत्त्व देण्यास प्रवृत्त करतो, तर काहींना असा विश्वास पटवून देतो की गरिबी हेच खरे धार्मिकत्व आहे. माझा असा विश्वास आहे की, संतुलित जीवन हेच एकमेव सुरक्षित जीवन आहे.
आणि जीवनातील प्राधान्यक्रम देवाच्या सत्याशी सुसंगत ठेवून म्हणजे प्रार्थना आणि काम यांनी संतुलित जीवन जगता येते आणि तुमच्यासाठी असलेल्या त्याच्या योजनेकडे लक्ष देऊन तुमचे जीवन व सुरक्षित पायावर उभे कराता येते.
हे पित्या, मला अतिरेक गोष्टींपासून दूर राहून संतुलित जीवन जगण्यास मदत कर. माझे प्राधान्यक्रम तुझ्या सत्याशी सुसंगत ठेव आणि माझे जीवन तुझ्यावर आधारलेले असेल आणि कामात तुझे सहाय्य आहे त्याबद्दल धन्यवाद, येशु च्या नावात आमेन