
तरीही परमेश्वर विश्वासू आहे, आणि तो तुम्हाला बळकट करील, तुम्हाला भक्कम पायावर उभे करील आणि दुष्टापासून तुमचे रक्षण करील.
मुलगा मोठा होत असताना, त्याला जाणवू लागते की तो त्याच्या आईसारखा नाही आणि तो स्वतःला तिच्यापासून वेगळे समजतो. त्याचे पुरुषत्व वेगळेपणानेच परिभाषित होते. तो सामान्यतः स्वतःची ओळख आणि व्यक्तिमत्त्व शोधतो. मुलीच ही तसच आणि ती सहसा तिच्या आईच्या जवळ राहते व तिच्यावर अवलंबून असते.
पुरुषांपेक्षा सुमारे दुप्पट स्त्रियांना नैराश्य येते आणि मनःस्थिती बदलणारी किंवा चिंता कमी करणारी सुमारे ७० टक्के औषधे स्त्रिया घेतात. सांख्यिकीयदृष्ट्या स्त्रियांमध्ये नैराश्याचे प्रमाण जास्त असते कारण त्यांना अधिक परावलंबी आणि प्रेम-शोधक बनण्याची शिकवण दिली जाते, आणि त्यामुळे त्या क्वचितच स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करतात. एक स्त्री इतरांना खूश करणे, इतरांना आकर्षक वाटणे, स्वतःची काळजी घेतली जाणे आणि इतरांची काळजी घेणे याला सर्वोच्च प्राधान्य देते. स्त्रियांना “मला काय हवे आहे?” या विचारापासून दूर आणि “त्यांना काय हवे आहे?” या विचाराकडे नेणारे तीव्र प्रशिक्षण दिले जाते. ते त्यांच्या सभोवतालच्या लोकांमध्ये केवळ विलीन होऊन जाण्याच्या धोक्यात असू शकतात आणि आपण हक्क व गरजा असलेली एक स्वतंत्र व्यक्ती आहोत, हे ओळखण्यात अयशस्वी होऊ शकतात; आणि त्यांना आपले स्वातंत्र्य प्रस्थापित करण्याची गरज आहे.
हे प्रभू, माझे स्वातंत्र्य गमावणे आणि इतरांवर पूर्णपणे अवलंबून राहण्याच्या जाळ्यात अडकणे किती सोपे आहे. मला सामर्थ्य दे आणि तुझ्या स्वातंत्र्याच्या भक्कम पायावर मला स्थापित कर, आमेन.