विश्वासार्ह

विश्वासार्ह

“चला, मी केलेले सर्वकाही ज्याने मला सांगितले, तो मनुष्य पाहा; तोच ख्रिस्त असेल काय?”

समारी स्त्रीने येशूवर इतका विश्वास ठेवला की ती आपल्या लपण्याच्या ठिकाणातून बाहेर आली. ती इतकी सावध होती की, शेजाऱ्यांशी सामना टाळण्यासाठी दुपारच्या कडक उन्हात जड पाण्याचे भांडे घेऊन विहिरीवर जात असे; तरीही, या अनोळखी व्यक्तीमध्ये (येशूमध्ये) काहीतरी असे होते, ज्यामुळे तिला मोकळेपणाने बोलण्याची प्रेरणा मिळाली. तिला कळायच्या आतच, तिने त्या यहुदी व्यक्तीसमोर आपले मन मोकळे केले, ज्याला तिच्याबद्दल सर्व काही माहीत होते. तिला आपल्या शेजाऱ्यांसोबत सुरक्षित वाटत नव्हते, पण येशूच्या उपस्थितीत तिला सुरक्षिततेची जाणीव झाली.

आपल्या आयुष्यातील आध्यात्मिकदृष्ट्या दूर असलेल्या व्यक्ती आपल्याला कशा पाहतात? त्यांना देवाचा स्वीकार करणे कठीण का वाटते, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. कोणी आध्यात्मिक विषयांवरील संभाषणास विरोध दर्शवला, तर आपल्याला कदाचित ते वैयक्तिकरीत्याही लागू शकते.

कधीकधी आपण अशा लोकांच्या मोकळेपणाच्या अभावासाठी त्यांना दोष देतो, परंतु कदाचित काही प्रश्न आपण स्वतःलाच विचारले पाहिजेत. हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, जोपर्यंत लोकांना सुरक्षित वाटत नाही, तोपर्यंत ते सहसा आपले मन मोकळे करत नाहीत. त्यामुळे आपण स्वतःला विचारू शकतो, “काही जुन्या अनुभवांवरून त्यांना असे वाटले असेल का की, अशा प्रकारच्या संभाषणासाठी आपण एक ‘सुरक्षित व्यक्ती’ नाही आहोत?”

अविश्वासू मित्र, कुटुंबीय किंवा ओळखीच्या व्यक्तींच्या प्रतिक्रिया आपल्या नियंत्रणात नसतात, त्या देवाच्या हातात आहेत. मात्र, आपण लोकांशी कसे वागतो, हे आपल्या नियंत्रणात असते. मनापासून दाखवलेली उत्सुकता विश्वास निर्माण करू शकते, परंतु आपला दृष्टिकोन इतरांवर लादण्याचा किंवा तो ‘विकण्याचा’ प्रयत्न केल्यास, तो विश्वास लगेच नष्ट होऊ शकतो.

स्वतःला विचारा, “शेवटच्या वेळी कधी, आध्यात्मिकदृष्ट्या दूर असलेल्या एखाद्या व्यक्तीला माझ्याकडून खरोखरची उत्सुकता आणि काळजी जाणवली होती?”

हे प्रभू, मला नातेसंबंधांत विश्वासार्ह बनायला शिकव. तुझे प्रेम प्रतिबिंबित करण्यास, काळजीपूर्वक ऐकण्यास आणि अशी सुरक्षित वातावरणे निर्माण करण्यास मला मदत कर, जिथे इतर लोक तुझ्या सत्याचा अनुभव घेऊ शकतील. आमेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *