लोकांना जाणून घेण्यासाठी वेळ द्या

लोकांना जाणून घेण्यासाठी वेळ द्या

“वरवरुन पाहून न्याय करू नका तर यथार्थ न्याय करा.”

अनेक वर्षांपर्यंत मी अशी व्यक्ती होते जी घाईघाईने कोणाबद्दलही मत बनवत असे. देवाने मला याबाबतीत अनेकदा जाणीव करून दिली आणि शेवटी मला उमजले की, घाईने आणि वरवरच्या गोष्टींवरून कोणाबद्दल मत बनवणे किती धोकादायक असू शकते.

कोणाबद्दलही मत बनवण्यापूर्वी, ती व्यक्ती नक्की कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे. अन्यथा, आपण दोन प्रकारे चूक करू शकतो:

एखादी व्यक्ती वरवरु पाहतानी चांगली वाटते म्हणून आपण तिला पसंत करू शकतो, पण प्रत्यक्षात ती तशी नसते.

एखाद्या व्यक्तीचे बाह्य रूप किंवा एखादी कृती पाहून आपण तिला नापसंत करू शकतो, पण प्रत्यक्षात ती व्यक्ती आतून खूप चांगली असू शकते.

आपल्या सर्वांच्या काही खास सवयी, विचित्र वागणे किंवा अशा काही पद्धती असतात ज्या इतरांना सहज समजत नाहीत. आपल्यालाही त्याच्याच उदाहरणाचे अनुकरण करायला हवे. जर लोकांनी केवळ वरवरच्या गोष्टींवरून निर्णय घेतला असता, तर दावीद कधीही राजा म्हणून निवडला गेला नसता. अगदी त्याच्या स्वतःच्या कुटुंबानेही त्याला दुर्लक्षित केले होते; त्यांनी त्याला संभाव्य उमेदवारांच्या यादीतही समाविष्ट केले नसते. (१ शमुवेल १६:१–१३). परंतु, देवाने दाविदाचे हृदय पाहिले, एका मेंढपाळाचे हृदय. देवाला त्यात एक उपासक दिसला, ज्याच्या हृदयात देवाप्रती प्रेम होते आणि जो स्वतःला देवाच्या हातात घडवून घेण्यास तयार होता.

हे असे गुण आहेत ज्यांना देव महत्त्व देतो, परंतु ते नेहमी पहिल्या नजरेत दिसून येत नाहीत. मी तुम्हाला प्रोत्साहित करते की, तुम्ही देवाकडे जा आणि लोकांच्या बाबतीत पवित्र आत्म्याला तुमच्याशी बोलू द्या. तो लोकांची हृदये जाणतो; तोच तुम्हाला सांगू शकेल की, कोणापासून सावध राहायचे आहे की कोणाशी नाते निर्माण करायचे आहे. लोकांना जाणून घेताना आणि नातेसंबंध विकसित करताना स्वतःच्या निर्णयावर अवलंबून राहण्यापेक्षा देवावर विश्वास ठेवा.

हे पित्या, मला बाह्य रूपाच्या पलीकडे पाहायला आणि तुझ्याप्रमाणेच योग्य न्याय करायला शिकव. कोणाबद्दलही मत बनवण्यापूर्वी, त्यांचे हृदय खऱ्या अर्थाने जाणून घेण्याइतका संयम मला दे. येशूच्या नावात, आमेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *