प्रिय: ज्याच्यावर त्याचे प्रेम आहे.

प्रिय: ज्याच्यावर त्याचे प्रेम आहे.

त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे.

आपण सर्व जन एकमेकावर प्रेम करतो, जसे की एक कुटुंब ज्यात प्रेम प्रिती पाहायला मिळते पण बायबल आपल्याला सांगते की, देव प्रेम आहे. अनंतकाळापासून आहे आणि तो त्रैक्य म्हणजे, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे स्वतःच प्रेम आहे, देव एक आहे, तरी तो तीन व्यक्तींच्या स्वरूपात, एका परिपूर्ण आणि प्रेमपूर्ण अस्तित्वात आहे.

त्यामुळे, जेव्हा योहान असे म्हणतो की “देव प्रेम आहे,” तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, प्रेम करण्यासाठी त्रैक्य देवाला कोणाचीही किंवा कशाचीही निर्मिती करण्याची गरज नव्हती. देवामध्ये नेहमीच प्रेमाची विपुलता आहे. हे प्रेम देवाच्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी सुरू होते आणि देव जे काही करतो, त्या सर्वांमध्ये विस्तारते.

येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी आणि पुन्हा त्याच्या रूपांतरणाच्या वेळी, पित्याचा आवाज ऐकू आला: “हा माझा परम प्रिय पुत्र आहे, ज्याच्यावर मी प्रीती करतो” (मत्तय ३:१७; १७:५). आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट ही की, येशूच्या माध्यमातून देवाने आपले प्रेम आपल्यापर्यंत पोहोचवले आहे! इतकेच नव्हे, तर तो ‘प्रिय पुत्र’—आपला प्रभू येशू , प्रेम व्यक्त करण्यापलीकडे, त्याने आपल्यासाठी आपला जीव दिला आणि तो “आपल्या पापांसाठी प्रायश्चित्त” बनला.

आणि जेव्हा आपण त्यांचा स्वीकार करतो व त्यांच्या प्रीतीवर विश्वास ठेवतो, तेव्हा देव आपल्यामध्ये वास करतो आणि आपण त्याच्यामध्ये वास करतो. किती अद्भुत!

हे देवा, आमच्यावर प्रेम केल्याबद्दल आणि ज्याच्यावर तू प्रीती करतोस, त्या येशूद्वारे आम्हाला नवीन जीवन दिल्याबद्दल तुझे आभार. आम्हाला तुझ्या प्रेमाने भरून टाक, आणि तुझे प्रेम सर्वत्र पसरवण्यास आम्हाला मदत कर. आमेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *