देव तुमचे रक्षण करतो

देव तुमचे रक्षण करतो

परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करील. तुझ्या जिवाचे रक्षण करील, परमेश्वर तुझे येणेजाणे येथून पुढे सर्वकाळ सुरक्षित करील.

माझा एक मित्र एकदा बोटीतल्या खुर्चीवर बसून वचन वाचत होता की देव आपल्या दूतांना आपले रक्षण करण्याची जबाबदारी कशी देतो (स्तोत्र 91:11). काही वेळानी बोट एका मोठ्या लाटेवर आदळली, तिच्या बोटची खुर्ची निघाली आणि तिचे डोके आपटले. तिचे डोके दुखत होते पण तिला गंभीर दुखापत झाली नाही. तिने परमेश्वराला विचारले की त्याने तिचे त्यापासून संरक्षण का केले नाही आणि तो म्हणाला, “तू मेला नाहीस ना?”

देव काय करत नाही ते पाहण्यात आपण बराच वेळ घालवतो आणि तो जे करतो त्यावर लक्ष केंद्रित करण्यात पुरेसा वेळ नाही. माझा मित्र किती गंभीर जखमी झाला असेल याचा विचार करा; चालत्या बोटीतल्या खुर्चीवर बसणे शहाणपणाचे नाही हे शिकवण्यासाठी कदाचित देवाने तिला पडू दिले असेल. मी अनेकदा विचार करतो की एकाच वेळी किती लोक कार चालवतात. पण जगात खूप अपघात होत नाहीत. देव त्याचे व आपले रक्षण करतो.

देव आपले किती संरक्षण करतो हे आपल्याला माहित नाही, परंतु आजचे वचन सांगते की तो आपल्यावर लक्ष ठेवतो आणि आपले नुकसान होऊ देणार नाही. ही वचने त्याच्या मुलांसाठी आहेत, आणि आपण त्याचे आभार मानू शकतो की जरी अपघात झाला तरी तो हानी होऊ देणार नाही.

जे त्याच्यावर प्रेम करतात आणि त्याच्या इच्छा प्रमाणे करीतात त्यांचे तो संरक्षण करीतो असे देवाचे वचन आहे, म्हणून जर काही वाईट घडले, तर आपण देवावर विश्वास ठेवू, की त्यातून काहीतरी चागले होणार आहे.

पित्या, तुझ्या या संरक्षणाबद्दल धन्यवाद. मला प्रत्येक हानीपासून वाचवण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी तु जे काही करता हे समजण्यास मला मदत करा. जेव्हा एखादी गोष्ट चांगली नसते तेव्हा मला हे लक्षात ठेवण्यास मदत करा की तु ते चांगल्यासाठी करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *