मध्यस्थीची प्रार्थना

मध्यस्थीची प्रार्थना

“मग मी मानवाचा शोध घेतला जो बुरुज बांधून घेईल आणि जो माझ्या पुढे उभा राहील ती भूमिला मी नाश करू नये म्हणून; पण मला कोणी सापडला नाही.”

मध्यस्थी करणे म्हणजे दुसऱ्या कोणासाठी तरी प्रार्थना करणे, जर लोकांच्या देवाशी असलेल्या संबंधात काही दुरावा किंवा अडथळा निर्माण झाला असेल, तर आपल्याला त्या ठिकाणी उभे राहून त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे भाग्य लाभते. जर त्यांना काही गरज असेल, तर आपण त्यांच्यासाठी मध्यस्थी करू शकतो; अशा वेळी त्यांना सांत्वन आणि प्रोत्साहन मिळेल, अशी आपण अपेक्षा ठेवू शकतो. तसेच, त्यांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी योग्य वेळी त्यांना मार्गदर्शन करु शकतो, अशीही आपण अपेक्षा करू शकतो.

दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणे म्हणजे बी पेरण्यासारखे आहे. आपल्याला माहीत आहे की, पीक मिळवण्यासाठी बी पेरावेच लागते (गलतीकर ६:७). इतरांच्या जीवनात बी पेरणे, हा आपल्या स्वतःच्या जीवनात पीक मिळवण्याचा एक खात्रीशीर मार्ग आहे. जेव्हा जेव्हा आपण दुसऱ्या कोणासाठी प्रार्थना करतो, तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या यशाची खात्री करून घेत असतो.

दुसऱ्यांसाठी प्रार्थना करून त्यांना यशस्वी होण्यास मदत करा. जर तुम्हाला तुमचे कार्य (मिनिस्ट्री) यशस्वी व्हावे असे वाटत असेल, तर दुसऱ्याच्या कार्यासाठी प्रार्थना करा. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय यशस्वी व्हावा असे वाटत असेल, तर दुसऱ्याच्या व्यवसायासाठी प्रार्थना करा. जर तुम्हाला एखाद्या वाईट सवयीवर मात करायची असेल, तर अशाच प्रकारची गरज असलेल्या दुसऱ्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा.

प्रभू, मला इतरांसाठी मध्यस्थी करणाऱ्या जीवनाकडे घेऊन चल. मी तुला विनंती करतो की, तुझ्या आत्म्याद्वारे अशा लोकांची आठवण माझ्या मनात येऊ दे, ज्यांच्यासाठी मी प्रार्थना करू शकेन. तसेच, हे कार्य निष्ठेने पूर्ण करण्यासाठी मला मदत कर, आमेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *