आज्ञापालनाचे हृदय

आज्ञापालनाचे हृदय

“तुम्ही पापाचे गुलाम होता, तरी ज्या प्रकारच्या शिकवणीच्या पदरी तुम्हांला बांधले तिचे पालन तुम्ही मनापासून केले, आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्त्वाचे गुलाम झालात, म्हणून देवाची स्तुती असो.”

पौलाने लिहिले आहे की, रोममधील विश्वासणारे पूर्ण अंतःकरणाने आज्ञापालन करत होते. हे महत्त्वाचे आहे, कारण केवळ वरवरचे किंवा अनिच्छेने केलेले आज्ञापालन शक्य असते—जिथे वर्तनात आज्ञापालन दिसते, परंतु हृदयात आनंदाचा अभाव असतो.

देवाने सांगितलेल्या गोष्टींचे पालन करणे म्हणजे केवळ दिखावा करणे नव्हे, तर योग्य दृष्टिकोन ठेवणे होय. जेव्हा तुम्हाला खरोखर देवाला प्रसन्न करायचे असते, तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी त्याच्या सूचनांचे आणि मार्गदर्शनाचे पालन करण्यास अत्यंत उत्सुक असता.

मी तुम्हाला अधिक उच्च स्तरावरील आज्ञापालनासाठी प्रोत्साहित करू इच्छितो. तत्परतेने, पूर्ण निष्ठेने आणि आनंदाने आज्ञापालन करा. अशे व्यक्ती बनू नका, ज्यांच्याकडून अगदी साधी गोष्ट करून घेण्यासाठी देवाला कित्येक आठवडे प्रयत्न करावे लागतात. देवाने तुमच्याकडे जी अपेक्षा केली आहे, ती आनंदाने पूर्ण करा.

आज्ञापालन ही केवळ एक आध्यात्मिक जबाबदारी नाही, तर ती एक आध्यात्मिक संधी आहे! देवाप्रती असलेल्या तुमच्या आज्ञापालनाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आज्ञापालन हे बिया पेरण्यासारखे आहे, ज्या तुमच्या आयुष्यात आणखी आशीर्वादांचे फळ घेऊन येतात. (म्हणजेच, तुम्ही देवाला जे काही देता, त्यापेक्षा तो तुम्हाला नेहमीच अधिक देतो); तो तुमच्या आज्ञापालनाच्या बियांचे फळ नक्कीच देईल.

हे पित्या, मला पूर्ण अंतःकरणाने, आनंदाने आणि तत्परतेने तुझे आज्ञापालन करण्यास मदत कर; अनिच्छेने नको. माझा विश्वास आहे की, तुझ्याप्रती केलेल्या माझ्या आज्ञापालनाचे फळ मला नेहमीच मिळेल. आमेन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *