मागण्यापूर्वी उपासना करा

मागण्यापूर्वी उपासना करा

आणि पाहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला आणि त्याच्यासमोर गुडघे टेकून म्हणाला, “प्रभू, तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला शुद्ध करू शकता.”

कधीकधी, लोक आजचे शास्त्रवचन वाचतात आणि त्यातील सर्वात महत्त्वाचा भाग वगळतात. ते प्रथम या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात की त्या माणसाला कुष्ठरोग होता, जो एक भयंकर आजार असून तो बरा करण्यासाठी चमत्काराचीच गरज होती. मग ते त्याच्या प्रश्नाकडे लक्ष देतात आणि येशू त्याला बरे करण्यास तयार असेल की नाही याचा विचार करतात. आपण या गोष्टीकडेही लक्ष दिले पाहिजे की तो माणूस “त्याच्यासमोर गुडघे टेकून बसला.”

तो येशूसमोर गुडघे टेकून बसला, ही गोष्ट त्याच्या हृदयाची स्थिती प्रकट करते. तो प्रभूच्या उपस्थितीत नम्र होता, आणि त्याने चमत्काराची मागणी करण्यापूर्वी त्याची उपासना व सन्मान केला.

जेव्हा आपल्याला देवाकडून काही हवे असते, तेव्हा आपण आपल्या परिस्थितीवर इतके लक्ष केंद्रित करतो की देवाची उपासना आणि सन्मान करण्याच्या महत्त्वाकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आपल्याला त्याच्याकडून काय हवे आहे याबद्दल आपण थेट बोलू लागतो आणि तो जसा आहे त्याबद्दल त्याचे आभार मानायला विसरतो.

आज तुम्हाला कशाचीही गरज असो मग ती छोटी असो वा मोठी देव तुम्हाला मदत करू शकतो. पण तुम्ही त्याला तुमच्यासाठी काहीही करण्यास सांगण्यापूर्वी, तो जसा आहे त्याबद्दल त्याची स्तुती, उपासना आणि सन्मान करण्यासाठी वेळ काढा.

हे पित्या, तुझ्याकडे माझ्यासाठी काहीही मागण्यापूर्वी, तुझी उपासना करण्यास मला मदत कर. येशूच्या नावाने, आमेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *