सर्वात महत्त्वाची गोष्ट

सर्वात महत्त्वाची गोष्ट

येशू त्याला म्हणाला, “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीती कर.

मी एकदा एका महान ईश्वरभक्त स्त्रीला असे म्हणताना ऐकले, “देवावर प्रेम करा आणि मग तुम्हाला जे आवडेल ते करा.” माझा पहिला विचार असा होता की, जर आपण सर्वजण आपल्या मनाप्रमाणे वागलो, तर आपण अनेक वाईट गोष्टी करू. पण जर आपण देवावर खरोखर प्रेम करतो, तर तसे होणार नाही. येशू म्हणाला, “जर तुम्ही माझ्यावर खरोखर प्रेम करता, तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल” (योहान १४:१५). देवावरील आपल्या प्रेमापोटी, आपल्याला त्याला संतुष्ट करण्याची इच्छा असते. आपण गुलाम नव्हे, तर पुत्र आणि कन्या आहोत.

एक गुलाम संकटात न सापडण्यासाठी सर्व नियम पाळतो, परंतु पुत्र आणि कन्या पित्याचे हृदय ओळखतात आणि त्याला संतुष्ट करण्यात आनंद मानतात. जेव्हा आपल्याला आपल्या जीवनात आज्ञाभंगाचे क्षेत्र आढळते, किंवा आपल्याला असे वाटते की आपण पापाच्या मोहाचा प्रतिकार करू शकत नाही, तेव्हा पापाशी लढण्याऐवजी आपल्याकडे एक चांगला पर्याय आहे: आपण देवाच्या अधिक जवळ जाऊ शकतो, त्याच्या अद्भुत चांगुलपणाला ओळखून त्याच्यावर अधिक खोलवर आणि जिव्हाळ्याने प्रेम करू शकतो. मग पाप मोहक किंवा आकर्षक वाटणार नाही. जसजसे आपण देवाच्या जवळ जातो, तसतसे आपण पापाचा प्रतिकार करतो आणि त्याला आपल्या जीवनात घरटे बांधायला जागा मिळत नाही.

हे पित्या, मला तुला नेहमी संतुष्ट करायचे आहे. मला तुझ्याकडे आकर्षित कर आणि तुला अधिक चांगल्या प्रकारे ओळखायला व तुझ्यावर अधिक प्रेम करायला शिकव, आमेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *