मोठा विचार करा

मोठा विचार करा

आपल्या तंबूची जागा मोठी कर आणि आपल्या निवासस्थानांचे पडदे पसरू दे; काटकसर करू नकोस; आपल्या दोऱ्या लांब कर आणि खुंट्या घट्ट कर.

देवाचे वचन आपल्याला शिकवते की, आपण जे काही स्वप्न पाहू शकतो, कल्पना करू शकतो किंवा विचार करू शकतो, त्यापेक्षाही कितीतरी अधिक काहीतरी देव करू शकतो (इफिसकर ३:२०); मग आपण मोठी स्वप्ने का पाहू नयेत? देव आपल्याला केवळ कसेबसे दिवस ढकलत संकुचित आयुष्य जगावे असे इच्छितो, असे आपण नक्कीच मानत नाही. तो एक महान देव आहे आणि आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची विपुलतेने तरतूद करण्याची त्याची इच्छा आहे.

देवाने दिलेल्या गोष्टींबद्दल नेहमी समाधानी राहा, पण त्याच वेळी तुमच्या भविष्याबद्दल मोठे विचार करा. देवाचा उद्देश तुम्हाला मोठ्या कार्यात वापरण्याचा, तुम्हाला विपुल आशीर्वाद देण्याचा आणि तुम्हाला मोठी मदत करण्याचा आहे! तुमच्या स्वतःच्या संकुचित विचारांमुळे तुम्हाला एका मर्यादित आयुष्यात अडकून पडू देऊ नका.

हे पित्या, मोठे विचार करण्याची आठवण करून दिल्याबद्दल तुझे आभार! मला तुझे विचार करू दे आणि तुझी स्वप्ने पाहू दे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *