देवाचे वचन गोष्टी बदलून टाकते

देवाचे वचन गोष्टी बदलून टाकते

“‘मी विश्वास धरला म्हणून बोललो,’ ह्या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा तोच आत्मा आमच्या ठायी असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही.”

देवाने शब्दांद्वारे ज्या सर्व गोष्टी निर्माण केल्या ते आपण पाहतो. देवाने म्हटले, “प्रकाश होवो,” आणि प्रकाश झाला (उत्पत्ती १:३). इब्री लोकांस पत्र ११:३ मध्ये म्हटले आहे की, ज्या गोष्टी दृश्य आहेत, त्या अदृश्य गोष्टींपासून निर्माण झाल्या आहेत. आध्यात्मिक क्षेत्रात देवाने तुमच्यासाठी काही आशीर्वाद राखून ठेवले आहेत; कदाचित तुम्ही त्यांचा अनुभव घेतला नसाल, तरीही ते अस्तित्वात आहेत.

आज सकारात्मक शब्द बोला आणि ज्या गोष्टी अजून अस्तित्वात नाहीत (म्हणजेच ज्या अदृश्य आहेत), त्यांना आपल्या जीवनात बोलावून घ्या (रोमकर ४:१७). जर आज तुमच्यासमोर एखादी समस्या असेल, तर म्हणा, “माझी समस्या तात्पुरती आहे. देवाचे वचन सांगते की, ख्रिस्ताच्या माझ्यावरील प्रीतीमुळे मी विजयी आहे. जरी मला सध्या उत्तरे मिळत नसली, तरी देव माझ्या सर्व गरजा पूर्ण करेल.”

हे पित्या, आज मला संशयाचे शब्द नव्हे, तर विश्वासाचे शब्द बोलण्यास मदत कर. माझे शब्द तुझ्या वचनाशी सुसंगत असू दे, जेणेकरून मी तुझ्या अभिवचनांना माझ्या जीवनात प्रत्यक्षात उतरताना पाहू शकेन. आमेन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *