मी आहे

मी आहे

“येशू त्यांना म्हणाला, ‘मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, अब्राहामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे.

है वचन किती वजनदार आहे, हे अनेकदा ऐकणाऱ्यांच्या प्रतिक्रियेवरून समजून येते. काही शब्दांमुळे चेहऱ्यावर हास्य उमटते, काहींमुळे राग येतो, तर काही शब्द ऐकल्यावर लोक घड्याळाकडे पाहू लागतात, म्हणजेच त्यांना कंटाळा येतो. पण अशा शब्दांचे काय, जे ऐकल्यावर लोक दगड उचलून मारायला धावतात?

आजच्या आपल्या वचनात, जेव्हा येशूने “मी आहे” (I AM) असे म्हटले, तेव्हा ते ऐकणारे लोक थक्क झाले. त्यानंतर त्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला. का? कारण त्याने स्वतःची ओळख देण्यासाठी देवाचे नाव वापरले होते.

जेव्हा देवाने मोशेला आपल्या लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी बोलावले, तेव्हा त्याने हे नाव प्रकट केले होते: “मी जो आहे तो मी आहे… इस्राएल लोकांना सांग: ‘मी आहे’ (I AM) याने मला तुमच्याकडे पाठवले आहे… हे सर्वकाळ माझे नाव आहे” (निर्गम ३:१४-१५).

“मी आहे” (I AM) या नावामध्ये खूप खोल अर्थ दडलेला आहे. याचा अर्थ असा की, देव स्वतःमध्ये पूर्ण आहे, तो अनादी-अनंत आहे आणि तो सर्व प्रकारच्या उपासनेसाठी योग्य आहे. जेव्हा येशूने स्वतःला “मी आहे” असे म्हटले, तेव्हा तो हेच सांगत होता की, तोच तो देव आहे ज्याने मोशेशी संवाद साधला होता. हे ऐकणाऱ्यांना समजले होते, म्हणूनच ते त्याला दगडमार करायला ऊठले होते.

येशू म्हणतो की (I AM) मी आहे, तेव्हा आपली प्रतिक्रिया काय असली असती? सी. एस. लुईस यांनी असे नमूद केले आहे की, या परिस्थितीचे तीनच अर्थ निघू शकतात: एकतर येशू खोटे बोलत आहे आणि त्याला ते माहीत आहे, अशा स्थितीत तो दुष्ट ठरतो. किंवा, येशूला वाटते की तो देव आहे, पण तो चुकीच्या समजुतीत आहे, अशा स्थितीत तो भ्रमित (delusional) ठरतो. किंवा मग, येशू सत्य बोलत आहे, ज्याचा अर्थ असा की, तो खरोखरच अनंत देव आहे.

जर येशू खोटे बोलणारा किंवा भ्रमित असेल, तर आपण त्याला नाकारले पाहिजे. परंतु, जर तो देव असेल, तर आपण त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याची उपासना केली पाहिजे.

प्रभू येशू, तू देव आहेस. मी तुला त्यापेक्षा कमी दर्जाचे मानले, त्याबद्दल मला क्षमा कर. माझ्या जीवनाचा तु पिता म्हणून आणि खऱ्या अर्थाने सर्वांचा प्रभू म्हणून, मला तुझ्यासाठी विश्वासूपणे जगण्यास मदत कर. आमेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *