क्षमा तुम्हाला मुक्त करते.

क्षमा तुम्हाला मुक्त करते.

परंतु जे आता माझे ऐकत आहेत, त्या तुम्हांला मी सांगतो: [लक्ष देण्यासाठी, ही सवय लावा की] तुम्ही आपल्या शत्रूंवर प्रेम करा, जे तुमचा तिरस्कार करतात व द्वेषाने तुमचा पाठलाग करतात, त्यांच्याशी चांगले वागा (त्यांचे भले करा, त्यांच्याशी उदात्तपणे वागा).

देवाच्या वचनात आपल्याला अनेकदा अशी आज्ञा दिली आहे की, ज्यांनी आपला छळ केला किंवा आपल्याशी वाईट वागणूक दिली, त्यांना आपण क्षमा करावी; त्यांच्यासाठी प्रार्थना करावी व त्यांच्यावर प्रेम करावे; आणि देवाच्या न्यायाची वाट पाहावी. या सूचनांचे पालन करणे सोपे नाही; क्षमा करण्यासाठी आणि राग सोडून देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात.

खरं सांगायचं तर, मला असं वाटतं की देव आपल्याकडून ज्या गोष्टींची अपेक्षा करतो, त्यापैकी ही एक सर्वात कठीण गोष्ट आहे. हे कठीण आहे, पण अशक्य नाही. एखादी गोष्ट करण्याची क्षमता दिल्याशिवाय परमेश्वर आपल्याकडून कधीच कशाचीही अपेक्षा करत नाही. कदाचित आपली क्षमा करण्याची इच्छा नसेल, पण देवाच्या मदतीने आपण ते करू शकतो. जेव्हा आपण क्षमा करतो, तेव्हा आपण स्वतःवरच उपकार करत असतो आणि स्वतःला खूप मोठ्या दुःखापासून वाचवत असतो.

देवा, ज्यांनी मला दुखावले आहे त्यांना क्षमा करण्यास मला मदत कर. राग सोडून देण्याचे आणि आरोग्य व न्याय मिळवून देणाऱ्या तुझ्यावर विश्वास ठेवण्याचे सामर्थ्य मला दे. आमेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *