देवाच्या वचनावर मनन करा

देवाच्या वचनावर मनन करा

“नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे; त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल.”

ध्यान करणे म्हणजे एखाद्या गोष्टीचे मनात वारंवार विचार करणे आणि कदाचित ती गोष्ट हळू आवाजात पुटपुटणे. जर तुम्हाला चिंता कशी करायची हे माहीत असेल, तर तुम्हाला ध्यान कसे करायचे हेही माहीत आहे. चिंता करणे म्हणजे आपल्या समस्यांवर ध्यान करणे, परंतु योग्य ध्यान म्हणजे देवाच्या वचनावर विचार करणे. तुम्ही देवाच्या वचनावर जितका जास्त विचार कराल, तितके अधिक लाभ तुम्हाला मिळतील आणि ते वचन तुमच्या अस्तित्वाचा एक भाग बनेल. ज्या शास्त्रवचनांवर तुम्ही ध्यान केले आहे, ती वचने गरजेच्या वेळी तुम्हाला आठवतील.

स्तोत्र ३७ मध्ये दुष्ट लोकांमुळे अस्वस्थ न होण्याबद्दल सांगितले आहे आणि तिसऱ्या वचनात देवाबद्दल विश्वास ठेवण्यास व चांगले कार्य करण्यास सांगितले आहे. मी अनेकदा या शास्त्रवचनावर शिकवले आहे आणि त्यावर विचारही केला आहे. जेव्हा मी एखाद्या समस्येशी झुंजत असते किंवा अशा व्यक्तीच्या संपर्कात येते जिच्यामुळे मला त्रास होतो, तेव्हा हे वचन अनेकदा माझ्या मनात येते. ते मला पुन्हा आठवण करून देते की, माझे लक्ष देवावरील विश्वासावर केंद्रित ठेवावे आणि इतरांना मदत करावी.

जर तुम्ही देवाचे वचन तुमच्या हृदयात साठवून ठेवले, तर ते तुम्हाला पाप करण्यापासून दूर ठेवेल (स्तोत्र ११९:११). आजचे शास्त्रवचन असे आश्वासन देते की, जर आपण दिवस-रात्र देवाच्या वचनावर ध्यान केले, तर आपण जे काही करू त्यात आपल्याला यश मिळेल. हे ऐकायला किती छान वाटते, देवाचे वचन सामर्थ्याने परिपूर्ण आहे; आपण जितके जास्त हे वचन जाणून घेऊ, तितके अधिक सामर्थ्यवान बनू.

हे पित्या, मला दिवस-रात्र तुझ्या वचनावर ध्यान करण्यास आणि ते माझ्या हृदयात साठवून ठेवण्यास मदत कर. हे वचन माझ्या मनाचे नूतनीकरण करो आणि मार्गाला यशस्वी करो. येशूच्या नावात, आमेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *